का झाले नागपूरच्या विमानाचे मुंबई "इमर्जन्सी लॅंडिंग' ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

विमानात नागपूरकर प्रवाशांची संख्या मोठी होती. त्यातील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार इंडिगोच्या या विमानाची मुंबई विमानतळाहून निघण्याची वेळ सकाळी साडेअकरा वाजताची आहे. पण, हे विमान बऱ्याच उशिरा दुपारी सव्वा वाजता निघाले.

नागपूर : मुंबई विमानतळाहून नागपूरच्या दिशेने झेपावलेल्या विमानात अचानक गंभीर स्वरूपाचा तांत्रिक बिघाड निर्माण झाला. यामुळे विमानाचे तत्काळ मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करून घेण्यात आले. विमान सुखरूप उतरल्याने विमानतळावरील कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वाणस सोडला. घटनेनंतर प्रवाशांना पुढील विमानासाठी तब्बल सहा तास थांबवून घेण्यात आले. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

हाय दुर्बुद्धी  - ६५० रुपयांची लाच घेताना वनाधिकारी जाळ्यात

विमानात नागपूरकर प्रवाशांची संख्या मोठी होती. त्यातील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार इंडिगोच्या या विमानाची मुंबई विमानतळाहून निघण्याची वेळ सकाळी साडेअकरा वाजताची आहे. पण, हे विमान बऱ्याच उशिरा दुपारी सव्वा वाजता निघाले. आकाशात झेपावल्यानंतर काही मिनिटांमध्येच विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्वरित मुंबई विमानतळावरील कंट्रोलरसोबत संपर्क साधून माहिती दिली आणि इमर्जन्सी लॅण्डिंगची परवानगी मागितली. परवानगी मिळताच हे विमान मुंबईत उतरवून घेण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why the Mumbai Emergency Landing of Nagpur Aircraft?