पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचलेले हे टोकाचे पाऊल.. पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल.. वाचा काय घडले 

Wife end her life as husband misbehaves with her in Nagpur
Wife end her life as husband misbehaves with her in Nagpur
Updated on

नागपूर :  प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी उताविळ असलेल्या पतीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून महाजन ले-आऊट येथे २५ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. अश्विनी प्रवीण घुग्गुसकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरेडमध्ये राहणाऱ्या उच्चशिक्षित अश्‍वीनी हिचा २०१६ मध्ये प्रविण घुग्गुसकर (३२, महाजन ले-आऊट, हुडकेश्‍वर) याच्याशी विवाह झाला होता. सुरूवातीचे काही महिने व्यवस्थित संसार सुरू होता. त्यांना तिन वर्षाचा मुलगा आहे. त्यानंतर मात्र पतीने अश्‍वीनीला विनाकारण मारहाण करणे सुरू केले.

‘माझे एका युवतीवर प्रेम आहे, तिच्यासोबत लग्न करायचे आहे. त्यामुळे तू मुलासह माहेरी निघून जा’ अशी धमकी प्रविण पत्नीला देत होता. त्यामुळे अश्‍वीनीला पतीसह सासरे लक्ष्मण घुग्गुसकर, सासू लिलाबाई आणि आश्‍विनी काळबांडे हे सर्व जण मारहाण करीत होते. तिला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता.

प्रेयसीला आणले घरी

अश्‍विनी घटस्फोट देण्यास तयार नव्हती. त्यामुळे प्रविण हा प्रेयसीला थेट घरी आणत होता. पत्नीसमोरच प्रेयशीसोबत बेडरूममध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. वारंवार घडत असलेल्या या प्रकाराला अश्‍वीनी कंटाळली होती. पतीची प्रेयसीसुद्धा अश्‍विनीला धमकी देत होती.

म्हणून केले विषप्राशन

गुरुवारी सकाळी अश्विनीला पतीने माहेरी जाण्यासाठी मारहाण केली. प्रेयसीसोबत महिण्याभरात लग्न करण्याची धमकी दिली. त्यामुळे अश्‍विनीने विष प्राशन केले. ही बाब पतीच्या लक्षात आली, परंतु त्याने कुणालाही सांगितले नाही. अश्‍विनीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com