लॉकडाउन संपल्यावर तरी ग्राहक सलूनमध्ये येईल का, व्यावसायिकांना पडला प्रश्‍न,,,

file
file

मेंढला (जि.नागपूर)  : "लाकडाउन'मध्ये डोक्‍यावरील केस वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत काही ठिकाणी लपूनछपून कटिंग व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे सलून दुकानातील कारागीर, चालक, मालक हे आर्थिक संकटात सापडले आहेत. समजा लॉकडाउन संपल्यानंतरही ग्राहक सलूनमध्ये येतील का, प्रश्‍न सलून व्यावसायिकांना पडला आहे. एकता मंचचे नरखेड तालुका अध्यक्ष राहुल कान्होलकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समाजाला आर्थिक मदत करावी व व्यवसायाची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यास मदत करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

कारागिरांना 5000 हजार रुपयांची मदत द्यावी

सरकारने लवकरच अडचणीत असलेल्या सलून व्यवसायावर मार्ग काढण्याचे आवाहन नाभिक एकता मंचचे तालुका अध्यक्ष कान्होलकर यांनी केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने सर्व कारागिरांना एका महिन्याला हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील कारागिरांना 5000 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. राज्यात 5 लाख दुकाने असून सुमारे 21लाख कारागीर दुकाने बंद करून बसले आहेत. ग्रामीण भाग व शहरी भागासह अनेकांचे या धंद्यावरच पोट आहे. रोजच्या मजुरीवर पोट भरणाऱ्या सलून चालकाला तर आता उधारीवर धान्य मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने किमान 5000 हजार मदत केल्यास उदरनिर्वाहासाठी हातभार लागेल. सलून चालकांसमोर स्वतःचे घर चालवताना दुकानाचे भाडे, वीज देयक, कर, कारागिराचे वेतन अशा सर्वच बाजूने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यात लॉकडाउन संपल्यावर ग्राहक सलूनमध्ये येतील का? ही दुसरी समस्या चालकांसमोर निर्माण झाली आहे. तरी सरकारने काहीतरी पर्याय काढावा अशी मागणी नाभिक एकता मंचचे नरखेड तालुका अध्यक्ष राहुल कान्होलकर यांनी केली आहे. तसेच कारागिरांना दरमाह 5000 हजार रुपये अनुदान देण्यात यावे तसेच दुकानभाडे, घरभाड्यांकरिता अनुदान देण्यात यावे तसेच महिन्याचे वीजबिल दुकान व घरचे माफ करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे .

अशा प्रकारे देता येईल परवानगी
_सोशल डिस्टन्सिंगसाठी केवळ एक किंवा दोनच खुर्च्या ठेवाव्यात.
_अपॉइंटमेंट घेऊनच केस कटिंग करता येईल.
_सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या शरीराचे तापमान मोजूनच त्याला प्रवेश देण्यात येईल.
_पीपीटी किट्‌सचा वापर करून कारागीर फक्त केसकटिंग करतील.
_ग्राहक बसलेल्या खुर्चींसह कटिंग, दाढी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करता येईल.

चालक, मालकाची कमाई
_ग्रामीण भागात सलून कारागीर दिवसाला 300 ते400 रुपयांचा व्यवसाय करतात.
_तालुकास्तरावरील कारागीर दिवसाला 700 ते 900 रुपयांचा धंदा करतो.
_शहरी भागात एक कारागीर सरासरी 1000 ते1500 रुपयांचा व्यवसाय करतात.
_काही ठिकाणी 50 टक्के भागीदारीवर तर काही ठिकाणी वेतनावर कारागीर काम _करतात.दुकान चालकाला कारागिराच्या वेतनासह दुकानाचे भाडे, वीजबिल, कर, _महापालिकास्तरावरील शुल्क अशी विविध देणी भागवावी लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com