आग्रा येथील महिलांनी एका जणाला धूधू धुतले, कारण होते हे...

सावरगाव  :  महिलांनी पुढाकार घेउन पकडलेली गावात विकली जाणारी अवैध दारू.
सावरगाव : महिलांनी पुढाकार घेउन पकडलेली गावात विकली जाणारी अवैध दारू.

सावरगाव (जि.नागपूर) :  पोलिस अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत नसल्याच्या कारणावरून महिलांना कायदा हातात घेउन दारू विक्रेत्याला पकडून चांगलेच बदडून काढले. नरखेड तालुक्‍यातील आग्रा गावात ही घटना घडली. यानिमित्ताने पोलिसांचे अवैध दारूविक्रेत्यांचे संबंध उघडकीस आले आहेत.

अधिक वाचा : आईबाबा, मी या दुनियेत नसलो तर...असा प्रश्‍न विचारून अभियंत्याने केले

पोलिस बसतात मूग गिळून
आग्रा गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री विरोधात महिलांमध्ये रोष आहे. गावात राजरोसपणे अवैध दारू उपलब्ध होत असून तळीरामांमुळे महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच 29 जून रोजीला गावात महिलांनी एक बैठक घेउन यापुढे गावात अवैध दारूविक्री होऊ दिली जाणार नाही, असे पोलिसांना बजावले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर ही गावात अवैध दारूविक्री काही थांबली नव्हती. उलट महिलांनी बैठक घेऊन पोलिस दारूविक्रेत्यांच्याविरोधात कारवाई करत नसल्याने अवैध दारूविक्रेत्यांचे मनोबल वाढले होते. पोलिस काहीच करत नाही, हे लक्षात आल्यावर महिलांनी स्वतः गावाच्या वेशीवर निगराणी ठेवणे सुरू केले होते. काल संध्याकाळी ललित नावाचा दारू विक्रेता महिलांना दिसला. गावाच्या वेशीवर महिलांनी त्याला अडवले. त्याच्याकडील प्लास्टिकच्या डबक्‍याची पाहणी केली असता त्यात देशी दारू आढळली. त्यानंतर प्रचंड संतापलेल्या महिलांनी चक्क दुर्गेचा अवतार धारण करत या दारूविक्रेत्याला चांगलीच अद्दल घडविली. काही महिलांनी तर या दारू विक्रेत्याला चपलेने चांगलेच बदडले.

हेही वाचा : मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जिवाचं, वाचा वारांगणाची व्यथा...

महिलांना प्रचंड त्रास
घाबरलेला दारूविक्रेता महिलांची माफी मागू लागला. पुढे असे करणार नाही, असे सांगून सोडून देण्याची विनवणी करू लागला. महिलांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र तरीही त्याच्या विरोधात पोलिसांनी अद्यापपर्यंत ठोस कारवाई केलेली नाही. ग्रामीण भागात अवैध दारूचा महिलांना प्रचंड त्रास असतो. म्हणूनच आग्रा गावासारखीच अवैध दारूच्या विक्रीवर लगाम लावण्याची मागणी अनेक गावात होत असते. मात्र, जेव्हा कायदाची अंमलबजावणी करणारे पोलिस त्यांचे काम नीट करत नाही. तेव्हा महिलांना अशाच पद्धतीने कायद्याची मर्यादा ओलांडून स्वतःच दारू विक्रेत्यांना अद्दल घडवावी लागते. आणि नागपूर जिल्ह्यातील आग्रा गावात नेमके तेच घडले आहे.

हेही वाचा : सर्वसामान्य कोरोनासोबत जगण्याची कला हळूहळू अवगत करीत आहेत...वाचा हा रिपोर्ट..

गृहमंत्री देशमुखांच्या आदेशाला केराची टोपली ?
विशेष म्हणजे ज्या गावात ही घटना घडली ते आग्रा गाव गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघातील गाव आहे. त्यामुळे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही, असा गृहमंत्र्यांच्या इशारा त्यांच्याच मतदारसंघात पोलिसांनी गांभीर्याने घेतला नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com