महिलेचा पानठेला दोन महिन्यांपासून होता बंद; बचत खर्च झाल्यावर उसणवारी करून चालवले घर अन्‌ रात्री... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

ग्रामस्थांच्या मदतीने तिचा शोध घेतला. काही वेळांनी तिचा मृतदेह गावाशेजारी शिवारात असलेल्या विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती नरखेड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. 

जलालखेडा (जि. नागपूर) : जिल्हा नागपूर... तालुका नरखेड... गाव आग्रा... येथे वास्तव्यास असलेले बागडे कुटुंब... दोघे पती-पत्नी पानठेला चालवायचे... मात्र, लॉकडाउन सुरू झाला आणि पानठेला बंद पडला... दोन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने काय करायचे असा प्रश्‍न महिलेला पडला. काहीही समजत नसल्याने व आर्थिक अडचण निर्माण झाल्याने महिलेने टोकाचा निर्णय घेतला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरखेड शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आग्रा येथे सुरेखा प्रदीप बागडे (35) व प्रदीप उमाजी बागडे (40) हे दाम्पत्य राहतात. पानठेल्याचा व्यवसाय करून ते आयुष्याचा गाळा हाकीत होते. या पानठेल्याच्या भरवशावर कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना कोरोनाने देशात शिरकाव केला. याच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला. 

जाणून घ्या - ज्याने जीवापाड जपले त्याच्याच जीवावर उठला हा वळू... वाचा ही करूण कहाणी

लॉकडाउन सुरू झाल्याने बागडे यांचा पानठेल्याचा व्यवसाय बंद पडला. ज्या व्यवसायाच्या भरवशायावर रात्रीची चूल पेटायची, तोच बंद झाल्याने बागडे कुटुंब आर्थिक अडचणीत आले. दोन महिन्यांपासून काहीच व्यवसाय नसल्याने थोडीफार असलेली बचत खर्च झाली. काही प्रमाणात उसणवारी करून घर चालविले; परंतु वाढता लॉकडाउन व त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यामुळे सुरेखा हिने मृत्यूला जवळ करण्याचा निर्णय घेतला. 

शुक्रवारी रात्री साडेअकराला आग्रा शिवारातील विहिरीत उडी घेऊन तिने जीवनयात्रा संपविली. दुसऱ्या दिवशी पती प्रदीपने तिचा शोध घेतला असता ती घरी व शेजारीही दिसून आली नाही. मग ग्रामस्थांच्या मदतीने तिचा शोध घेतला. काही वेळांनी तिचा मृतदेह गावाशेजारी शिवारात असलेल्या विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती नरखेड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.

असे का घडले? - तुम्हाला रडवेल ही बातमी... चाळीस दिवसांच्या बाळाला घेऊन ओल्या बाळंतीनीला करावा लागला सतराशे किमी प्रवास

आर्थिक अडचणीतून घेतला निर्णय

लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद असल्याने अनेक व्यवसायिकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे नरखेड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आग्रा येथील पानठेलाचालक महिलेने मृत्यूला कवटाळले. तिने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. 

लॉकडाउनमुळे मृत्यूला कवटाळले

देशात कोरोनाने प्रवेश केल्यानंतर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पानठेला सुरू करण्याला अद्याप परवानगी न मिळाल्याने पानठेला चालकांना आर्थिक समस्यांना सामोर जावे लागत आहे. सतत वाढत असणाऱ्या लॉकडाउनमुळे महिला चिंतेत पडली. काहीही समजत नसल्याने व लॉकडाउनचा काळ वाढत असल्याने तिने थेट विहिरीत उडी घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman jumped into the well out of financial distress