esakal | बिनासंगम मार्गावर ट्रक-बोलोरोचा भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू  

बोलून बातमी शोधा

प्राप्त माहितीनुसार गोदावरी नामदेव भुरे वय ४८ वर्षे राहणार बिना संगम असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. तर ललिता ज्ञानेश्वर जांगळे-५३ व करूणा चांगदेव जांगळे-४५रा.बिनासंगम असे गंभीर जखमीचे नाव आहे.व सोबत असणा-या चौथ्या महिलेचे नाव अश्विनी कैलास बेलपांडे-३८}

प्राप्त माहितीनुसार गोदावरी नामदेव भुरे वय ४८ वर्षे राहणार बिना संगम असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. तर ललिता ज्ञानेश्वर जांगळे-५३ व करूणा चांगदेव जांगळे-४५रा.बिनासंगम असे गंभीर जखमीचे नाव आहे.व सोबत असणा-या चौथ्या महिलेचे नाव अश्विनी कैलास बेलपांडे-३८ रा.बिना संगम असे आहे. 

बिनासंगम मार्गावर ट्रक-बोलोरोचा भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू  
sakal_logo
By
दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : परिसरातील बिना संगम रोडवर अश्विनी शाळेजवळ नॅशनल ब्रिक्स समोर ट्रक व बोलोरो गाडीचा विचित्र अपघातात पायदळी जाणाऱ्या महिलेला बोलोरो गाडीने उडविले. ही घटना आज सकाळी ५:४५च्या सुमारास घडली. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

प्राप्त माहितीनुसार गोदावरी नामदेव भुरे वय ४८ वर्षे राहणार बिना संगम असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. तर ललिता ज्ञानेश्वर जांगळे-५३ व करूणा चांगदेव जांगळे-४५रा.बिनासंगम असे गंभीर जखमीचे नाव आहे.व सोबत असणा-या चौथ्या महिलेचे नाव अश्विनी कैलास बेलपांडे-३८ रा.बिना संगम असे आहे. 

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नेता आणि सामाजिक कार्यकर्ता फरार; आरोपींचा शोध सुरु 

सदर घटनेतील बिना संगम येथे राहणाऱ्या चारही महिला सकाळच्या सुमारास मार्निंगवाॅकरिता पायदळी मुख्य मार्गाने बिनजोड कडे जातांना निघाल्या होत्या. दरम्यान शाळेजवळ नॅशनल ब्रिक्स कंपनीसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्र MH-40-AK -7568 व बोलेरो गाडी MH-31-FC-4993 चा विचित्र अपघात घडला . 

दरम्यान कोळशाच्या खाली ट्रक व रेती वाहतूक करणारी बोलोरो पिकअप ही दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने जात असताना भरधाव ट्रकची बोलोरो गाडीला  कट लागून अचानक बोलेरो पिकअपचे चाक निघाले.यात बोलोरो गाडीचे संतुलन बिघडून बोलोरो ने पायदळी जाणाऱ्या महिलेला धडक दिली.धडक ईतकी भिषण होती की चाकाखाली आल्यामुळे महिलेचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला.  तर मृतकी सोबतच असणाऱ्या ईतर दोन महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना लागलीच कामठी येथे एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून त्यातील एक महिला मृत्यूशी झुंज देत आहे. 

सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पो.नि.भटकर,एपीआय मलकुलवार, पीएसआय निमगडे, खापरखेडा वाहतूक पोलीस कैलास पवार आदींनी घटनास्थळ गाठून जमाव पांगवित वाहतूक सुरळीत केली. सदर घटनेचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालय कामठी येथे हलविले. 

मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले...

सदर घटनेतील बोलोरो चालक राजू भुर्रे मु.बिनासंगम व ट्रक चालक रोहित झोराडे-२४ मु.छिंदवाडा मध्यप्रदेश या चालकाविरुद्ध  गुन्हा दाखल केला असून खापरखेडा पोलिस निरीक्षक भटकर,चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक मलकुलवार मॅडम घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ