महिला एक पाऊल पुढे... ऑनलाइनच्या माध्यमातून बनल्या हायटेक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

आपल्या बजेटमध्ये वस्तू हवी तितक्‍या रकमेची वस्तू खरेदी करण्याची मुभा त्यांना या माध्यमाने मिळते. त्यामुळे इतर कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आपला मोबाइल हेच आपलं खरेदीचं विश्व आहे, या भावनेतून महिला खरेदीकडे पाहतात आणि महिलांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळतो. 

नागपूर : सध्याचे युग हे इंटरनेटचे असल्याने ऑनलाईन राहण्याला कधी नव्हे ते अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडणे धोक्‍याचे असल्याने अशा परिस्थितीत ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसाय करणे फायद्याचे ठरत आहे. ऑनलाईन व्यवसायाची मार्केटिंग देखील ऑनलाईन होत आहे. यात महिला एक पाऊल पुढे असून ऑनलाइनच्या माध्यमातून महिला हायटेक बनल्या आहे. 

पारंपारिक व्यावसायाच्या चौकटी मोडून महिला "नो इनव्हेसमेंट.. पसंत तुमची, ऑर्डर आमची' या तत्वावर कपडे, ज्वेलरीचे ऑनलाईन व्यवसाय करत रोजगार मिळवत आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यात या व्यावसायिकांची दुपटीने वाढ झाली आहे. ड्रेस मटेरियल, दागिने, बेडशीट पिलो कव्हर, शोपीस, खाद्यपदार्थ, साड्या डिझायनर ड्रेस, डिझायनर दागिने अशा विविध प्रकारच्या वस्तू ऑनलाइन मार्केटिंगचा माध्यमाने या महिला सध्या विकत आहे आणि या व्यवसायाला ग्राहकांकडून देखील उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील अनेक महिला मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन मार्केटिंग करत वेबसाइटच्या आणि लिंकच्या माध्यमाने विक्री करत आहेत. 

हेही वाचा - पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला कुठे? वाचा धक्‍कादायक प्रकार...

खरेदीला महिलांकडून प्रतिसाद 
ऑनलाईन खरेदीला महिलांची अधिक पसंती आहे. त्यांना जे हवं तेच त्यांच्या पसंतीनुसार हवा इतका वेळ घेऊन त्या पाहू शकतात. आपल्या बजेटमध्ये वस्तू हवी तितक्‍या रकमेची वस्तू खरेदी करण्याची मुभा त्यांना या माध्यमाने मिळते. त्यामुळे इतर कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आपला मोबाइल हेच आपलं खरेदीचं विश्व आहे, या भावनेतून महिला खरेदीकडे पाहतात आणि महिलांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळतो. 

वस्तू थेट ग्राहकाच्या घरी 
आजच्या या महागाईच्या आणि लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद आहे. तसेच दुकाने घेऊन देखील त्यात माल भरण्यासाठी फार खर्च येतो. त्यातच ग्राहकाला अनेक व्हरायटी लागतात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईटचा वापर करत अनेक महिलांनी ऑनलाईन बिझनेस सूर केले आहे. यात व्हॉट्‌सअँप ग्रुप तयार करून त्या साड्या, ड्रेस, ज्वेलरी, किचनमधील वस्तुचे मार्केटींग करत आहेत. ऑनलाईन कंपन्यांकडे त्याचे फोटो पाठवून माहिती दिली जाते. ज्यांना त्या घ्यायच्या आहे त्या महिला त्या वस्तूची ऑनलाईन ऑर्डर देतात आणि त्यांनतर वस्तू थेट घरी येतात.

जाणून घ्या - छत्रपती शिवरायांनी तिनवेळा लुटले होते वऱ्हाडातील हे शहर

ऑनलाइन कंपनीसोबत टायअप
लॉकडाऊन मुळे कुणाला बाहेर पडता येत नाही परंतु, आवश्‍यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी काय करावे यासाठी पर्यायाचा शोध घेतला जा आहे. म्हणून मी या काळात एका मोठ्या ऑनलाइन कंपनीसोबत टायअप करून, व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि इतर ऍपवर महिलांचे ग्रुप तयार करून, कपडे, किचन वस्तु, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने इत्यादींचे मार्केटींग करीत आहे. यातुन कंपनीतर्फे कमीशन स्वरूपात काही रक्कम माझ्या बॅंक खात्यात जमा होते.
- जुही काकडे,
नलाइन सेलर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women became high-tech through online