यशोगाथा : आदिवासी महिलांनी शेणामधुन साकारल्या विविध कलाकृती

सुषमा सावरकर 
Friday, 23 October 2020

एक आदीवासी पाडा म्हणुन ओळख असलेल्या या गावात महीलांनी अश्‍या प्रकारे व्यवसाय सुरु करणे वाटते , तेवढे सोपे नव्हते. 

नागपूर - यशस्वितेचा आणि विकासाचा ध्यास घेऊन, कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा गावच्या महीलांनी एक वर्षाआधी पर्यावरण पुरक धुपबत्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. एक आदीवासी पाडा म्हणुन ओळख असलेल्या या गावात महीलांनी अश्‍या प्रकारे व्यवसाय सुरु करणे वाटते , तेवढे सोपे नव्हते. 

आजही अनेक गोष्टींसाठी होणारी पायपीट महीलांच्याच नशिबात अधिक आहे. परंतु, मनात यश्‍वितेची कास धरणाऱ्या या महीला गप्प बसणे शक्‍य नव्हते. आणि अश्‍यातच त्यांना साथ मिळाली ती दै. सकाळ समुहाच्या तनिष्का व्यासपीठाची. अनेकदा भेटी देऊन, या महीलांचे मत जाणुन घेऊन, शेवटी यांना एक पर्यावरण पुरक अश्‍या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे नागपूर तनिष्का व्यासपिठा मार्फत ठरविण्यात आले. 

जाणून घ्या - सर्तक रहा, आणखी पाऊस येणार म्हणजे येणार!

एका संस्थेच्या मदतीने त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर वाळवलेल्या व ओल्या अश्‍या दोन्ही शेणापासुन सुगंधित व पर्यावरण पुरक धुपबत्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरु झाला. साचे, नॅचरल सुगंधित पदार्थ, शेण, पॅकींग करायचे बॉक्‍स यातच दिवसभर या महीला रमु लागल्या. आणि लाडई मध्ये तयार होणाऱ्या या धुपबत्ती अनेक ठीकाणी विकल्या जाऊ लागल्या. या व्यवसायाच्या बळावर शासनाचे अनेक पुरस्कारही या लाडई तनिष्का गटाला प्राप्त झाले.

महत्वाचं म्हणजे, केवळ धुपबत्ती व्यवसाय पुरतेच मर्यादीत राहुन या महीला थांबल्या नाहीत. तर यावर्षी पासुन त्यांनी शेण व इतर कच्चया मालाच्या मदतीने दिवे, धुपबत्ती स्टॅंण्ड, हवन धुपबत्ती स्टॅण्ड, सामराणी कप, गणपती, तसेच दिवाळी मध्ये वापरण्यात येणाऱ्या अनेक शोभेच्या वस्तु सुध्दा त्या आता ऑर्डर प्रमाणे पुर्ण करुन देत आहे. 

सविस्तर वाचा - अर्ध्यारात्री बोलावले तरी यावेच लागेल!, श्रीमुखात लगावली

यामाध्यमातुन संपुर्ण व्यवसायाच्या माध्यमातुन महीला दिवसाला 500 ते 600 रुपये नफा मिळवित आहे. महीलांच्या या कामगिरीमुळे लाडई गावाचे नाव केवळ कळमेश्‍वर तालुक्‍यातच नाही. तर इतरत्रही उंचावत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women made things from cow dunk