'तुझ्या काकाकडे सोने गहाण ठेवून पैसे मिळवून दे' असं म्हटल्यावर तो सोबत गेला अन्‌...

योगेश बरवड
शनिवार, 11 जुलै 2020

प्रज्वलला धकमी दिल्यानंतर वाहनाचे सर्व दार आणि खिडक्‍या बंद करून आरोपी कारबाहेर पडले. प्रसंगावधान राखत प्रज्वलने आईला फोन करून घटनेची माहिती दिली. आईने याबाबत पोलिसांना सूचना दिली. थोड्याचवेळात पोलिस उभ्या असलेल्या कारजवळ पोहोचले. त्यांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत प्रज्वलची सुटका केली.

नागपूर : खामल्यातील कश्‍यप अपार्टमेंटमध्ये राहणार युवक मागील वर्षी सेंटर पॉईंट कॉलेजमध्ये बारावीत शिकत होता. त्याची वर्गातील एका मुलीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यांचे बोलणे चालणे सुरू होते. मात्र, मागील दहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांना भेटले किंवा बोलले नव्हते. अशात तिचा मावस भाऊचा युवकाला फोन आला अन्‌ पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल हजारे (वय 20, रा. कश्‍याप अपार्टमेंट, खामला) हा मागील वर्षी सेंटर पॉईंट कॉलेजमध्ये बारावीत शिकत होता. त्याच्या वर्गात प्रियांका सिंग नावाची मुलगी होती. एकाच वर्गात असल्याने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यांचे एकमेकांची बोलणे आणि भेटणे सुरू होते. मात्र, त्यांच्यात काय झाले की मागील दहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांना भेटले किंवा बोलले नव्हते.

हेही वाचा - बीफार्म पदवीधर युवकाने केली कोरफडीची शेती अन् झाला लघुउद्योगाचा मालक...बेरोजगारांना दिला रोजगार

गुरुवारी दुपारी अचानक प्रियांकाचा मावस भाऊ रजत सुरेश मौर्य (वय 26, रा. पारधीनगर, एमआयडीसी) याने प्रज्वलला फोन केला. "तुझ्या काकाकडे सोने गहाण ठेवून मला पैसे मिळवून दे' अशी गळ घालत सोबत चलण्याची विनंती केली. प्रज्वलही मदतीच्या भावनेने रजतची मदत करण्यास तयार झाला. प्रज्वल रजतच्या कारमध्ये बसून काकाकडे जाण्यासाठी निघाले. 

यावेळी अगोदरच कारमध्ये रोहित राजेंद्र चव्हाण (वय 27, रा. एसबीआय कॉलनी, एमआयडीसी) व नितीन राजेंदर त्यागी (वय 27, रा. लोकमान्यनगर) बसले होते. त्यांनी गाडी हिंगण्याकडे वळवली. यावेळी प्रज्वलने कुठे घेऊन जात आहात, अशी विचारणा केली. पण, आरोपींनी कोणतीही माहिती दिल नाही. काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपींनी गाडी थांबवली.

अधिक माहितीसाठी - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

प्रज्वलला धकमी दिल्यानंतर वाहनाचे सर्व दार आणि खिडक्‍या बंद करून आरोपी कारबाहेर पडले. प्रसंगावधान राखत प्रज्वलने आईला फोन करून घटनेची माहिती दिली. आईने याबाबत पोलिसांना सूचना दिली. थोड्याचवेळात पोलिस उभ्या असलेल्या कारजवळ पोहोचले. त्यांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत प्रज्वलची सुटका केली. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे. 

प्रियांकासोबत पुन्हा बोलला तर तुला मारू

प्रियांकाच्या मावस भावाने प्रज्वलचे कारमध्ये अपहरण केल्यानंतर हिंगण्याकडे गेले. तिथे आरोपींनी प्रज्वला प्रियांकापासून दूर राहण्यास सांगितले. "प्रियांकासोबत पुन्हा बोलला तर तुला मारू' अशी धमकी दिली. अगदी वेळेवर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करीत तिन्ही आरोपींना अटक केली. 

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man abducted and threatened in Nagpur