आजी सकाळपासून विचारत होती नातू कुठे गेला; सायंकाळी लहान भावाला नदीत तरंगतांना दिसला मृतदेह

अनिल ढोके
Sunday, 8 November 2020

शनिवारी गावात इतरत्र वीरेंद्रचा शोध घेत असता सकाळी १० च्या सुमारास त्याचा मित्र दीपक गजबे यांच्याकडून समजले की, गावाबाहेरील कब्रस्थानजवळील नदीच्या पुलावर कपडे, चप्पल व मोबाईल पडले असल्याचे सांगीतले. लहान भाऊ हा मित्रांसह नदीकडे गेला असता तिथे वीरेंद्रची हिरव्या रंगाची फूल टी शर्ट, काळ्या रंगाचा नाईट पैंट, बनियान, मोबाईल व चपला आढळल्या.

मोवाड (जि. नागपूर) : येथील एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी मोवाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलगा हा मोवाड नगरपरिषद कार्यालयात कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत होता. त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचे गांभीर्य तपासण्यासाठी आव्हानात्मक भूमिका बजावावी लागणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोवाड येथील रहिवाशी वीरेंद्र अशोक गजबे (वय २५) हा मागील एक वर्षापासून मोवाड नगरपरिषद कार्यालयात कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी (ता. ६) सकाळी ७.३० च्या सुमारास वीरेंद्र हा घरून बाहेर गेला असता त्याचा लहान भाऊ मनीष व आजी शांताबाई हे झोपेतच होते.

सविस्तर वाचा - सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

सकाळी ८ वाजताच्या सुमारास सगळे झोपेतून ऊठल्यावर आजी शांताबाईने वीरेंद्र कुठे गेला असल्याची विचारपूस केली. तो बाहेर गेला असल्याचे इतरांनी सांगितले. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्याचा लहान भाऊ शेतामध्ये कामावर गेला. त्याच दिवसी वीरेंद्र न. प. कार्यालयात का आला नाही, त्याचा फोनही लागत नाही म्हणून गावातील एका इसमाने नातेवाईकाला फोन करून विचारपूस केली. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी गावात दिवसभर शोधाशोध केली. मात्र, त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. त्याच्या लहान भावाच्या म्हणण्यानुसार त्यानेही वीरेंद्रला वारंवार फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोनच लागत नव्हता.

शनिवारी गावात इतरत्र वीरेंद्रचा शोध घेत असता सकाळी १० च्या सुमारास त्याचा मित्र दीपक गजबे यांच्याकडून समजले की, गावाबाहेरील कब्रस्थानजवळील नदीच्या पुलावर कपडे, चप्पल व मोबाईल पडले असल्याचे सांगीतले. लहान भाऊ हा मित्रांसह नदीकडे गेला असता तिथे वीरेंद्रची हिरव्या रंगाची फूल टी शर्ट, काळ्या रंगाचा नाईट पैंट, बनियान, मोबाईल व चपला आढळल्या.

जाणून घ्या - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये

मृत वीरेंद्रचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला. नागरिकांच्या सहायाने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नरखेड येथे पाठविण्यात आला. याप्रकरणी मोवाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास नरखेड ठाण्याचे तपास अधिकारी कैलाश ऊईके, मोवाड चौकीचे शैलेश डोंगरदीवे, नीलेश खरडे व प्रशांत शेंडे हे करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man drowns in river in Nagpr Gramin