VIDEO: याला म्हणतात उत्साह! वय १०६ अन् तरुणांना लाजवेल अशी इच्छाशक्ती; बजावला मतदानाचा हक्क

प्रशिक मकेश्वर
Friday, 15 January 2021

वार्धक्याने गयाबाई चवणे थकल्या असल्या तरी त्यांच्यामध्ये असलेला मतदानाचा उत्साह मात्र तरुणांप्रमाणे कायम आहे.प्रत्येक निवडणूकित त्या नेहमी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहिच्या या प्रक्रियेत त्या सहभाग नोंदवतात..

तिवसा (जि. अमरावती) : जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी साडे सात वाजतापासून सुरुवात झाली आणि.ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेत तिवसा तालुक्यातील मोझरी गावातील १०६ वर्षाच्या गया चवने या आजीबाईंनी देखील उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्साहाचं सगळेजण कौतुक करत आहेत. 

वार्धक्याने गयाबाई चवणे थकल्या असल्या तरी त्यांच्यामध्ये असलेला मतदानाचा उत्साह मात्र तरुणांप्रमाणे कायम आहे.प्रत्येक निवडणूकित त्या नेहमी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहिच्या या प्रक्रियेत त्या सहभाग नोंदवतात..गावाचा विकास फक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होतो त्यामुळे सर्वांनी मतदान करावे असे आवाहन देखील गया आजीने केले आहे.

नक्की वाचा - नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'

तिवसा तालुक्यातील मोझरी गावात गयाबाई किसनराव चवणे या १०६ वर्षीय असून प्रत्येक निवडणुकीत त्या आपला मतदानाचा हक्क बजावतात.निवडणूक आली की मतदानाच्या दिवशी त्या स्वयंपूर्तीने तयार होऊन आपल्या कुटूंबासोबत त्या मतदान करायला जातात.सहा लोकांचं कुटूंब असलेल्या चवणे कुटुंबातील गयाबाई या प्रमुख असल्याचा त्यांचं कुटुंब सांगतात. आज जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतच्या निवडणूक होत आहे. यात अनेक जण निवडणुकीत मतदान करण्याचा नकार देतात पण गयाबाई या आजही उत्साहाने जातात.

 

 

गयाबाई यांनी ज्या गावात मतदान केले ते मोझरी गावं राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे ही गाव आहे.त्यामुळे या गावातील निवडणूक राजकिय दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे.मागील दहा पेक्षा जास्त वर्षांपासून या गावात यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम आहे.या निवडणुकीत मतदार हे यशोमती ठाकूर यांच्या गटाला पसंती देतील की दुसरा पर्याय निवडतील हे निकाला नंतरच स्पस्ट होणार आहे.\

अधिक माहितीसाठी - मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ

यावेळी आपल्या जन्मगावी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला व गावातील मंडळींची चर्चादेखील केली तर  १०६ वर्ष वय असणाऱ्या गयाबाई चवणे तसेच दिव्यांग व्यक्तीची विचारपूस करत भेट घेतली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 106 years old Woman voted in Gram Panchayat Elections in Amaravati