गोंदियात पुन्हा आढळले 11 कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

गोंदिया तालुक्‍यातील 8 रुग्ण, सडक अर्जुनी तालुक्‍यातील 2 रुग्ण, आणि एक रुग्ण हा तिरोडा तालुक्‍यातील असे एकूण 11 रुग्ण आढळून आले.

गोंदिया : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतो आहे. आज 3 जुलै रोजी आणखी अकरा जणांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला.
गोंदिया तालुक्‍यातील 8 रुग्ण, सडक अर्जुनी तालुक्‍यातील 2 रुग्ण, आणि एक रुग्ण हा तिरोडा तालुक्‍यातील असे एकूण 11 रुग्ण आढळून आले.

सविस्तर वाचा - आयुक्‍त मुंढेंना आता कोणी दिला इशारा?
काही दिवसांपासून दररोज जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.नागरिकांमध्येही दहशत पसरली आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णाची संख्या 156 झाली आहे तर क्रियाशील रुग्णांची संख्या 52 वर पोहचली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 corona positives in Gondia district