

Shock in Wardha as Minor Girl Is Found Dead; Authorities Launch Detailed Investigation
sakal
वर्धा: नजीकच्या रोठा तलाव परिसरात अंगावर शहारे उभे करणारी घटना घडली. अवघ्या बारा वर्षीय मुलीचा झोपडीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने संबंधीत मुलीवर अत्याचार केल्यावर तिची हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही घटना बुधवारी (ता. १५) सायंकाळी उशीरा उघडकीस आली असून अधिकची माहिती सध्या सावंगी पोलिस घेत आहेत.