esakal | शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानात साधली संधी, अमरावतीमध्ये १२७३ शेतकरी कृषी वीजबिलातून मुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

1273 farmers free from agriculture electric bill in amravati

महावितरणचे महाकृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्‍के माफ करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानात साधली संधी, अमरावतीमध्ये १२७३ शेतकरी कृषी वीजबिलातून मुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शासन तसेच महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानाने शेतकऱ्यांना कृषीपंपाच्या थकबाकीत भरघोस सवलत देत थकबाकी मुक्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील १२७३ शेतकऱ्यांनी आपले कृषीबिल कोरे करून घेतले आहे. 

या अभियानांतर्गत ७० टक्‍क्‍यांपर्यंत सवलतीचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील १२७३ शेतकऱ्यांमध्ये प्रामुख्याने नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यातील व मोर्शी तालुक्‍यातील प्रत्येकी १८२ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. सोबतच शेंदूरजनाघाट ९५, बडनेरा ८८, वरुड ११८, भातकुली ७५, धामणगाव ८८, अचलपूर ८०, अंजनगाव २२, चिखलदरा ३०, दर्यापूर ६, धारणी १५, चांदूरबाजार ७३ तर चांदूररेल्वे येथील ६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

महावितरणचे महाकृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्‍के माफ करण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्‍के माफ करून व्याज १८ टक्‍क्‍यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे. 

हेही वाचा - दिपाली वऱ्हाडेने शिक्षणासोबत पेलली गावाची जबाबदारी; वयाच्या २७ व्या वर्षी झाली सरपंच

तीन वर्षांसाठी असलेल्या या अभियानात ज्या ग्राहकांनी एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला, त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्‍के, दुसऱ्या वर्षी ३० टक्‍के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्‍के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलाची रक्कम भरणेही गरजेचे आहे, असे महावितरणने सांगितले. 


 

loading image