esakal | अमरावतीत १४ ग्रामपंचायतींनी पटकाविला बिनविरोधचा मान, 11 हजार 353 उमेदवार रिंगणात
sakal

बोलून बातमी शोधा

14 grampanchayat election without oppose in amravati

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीतील वादविवाद, तंटे टाळण्यासाठी अनेकांनी याकामी पुढाकार घेतला खरा. मात्र, 553 पैकी केवळ 14 ग्रामपंचायतींनी निवडणुकीला खो दिला आहे.

अमरावतीत १४ ग्रामपंचायतींनी पटकाविला बिनविरोधचा मान, 11 हजार 353 उमेदवार रिंगणात

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींनी आपल्या शिरपेचात बिनविरोधचा सन्मान पटकाविला आहे. असे असले तरी 4 हजार 452 जागांसाठी  अद्यापही 11 हजार 353 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण आता चांगलेच तापले आहे. 

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीतील वादविवाद, तंटे टाळण्यासाठी अनेकांनी याकामी पुढाकार घेतला खरा. मात्र, 553 पैकी केवळ 14 ग्रामपंचायतींनी निवडणुकीला खो दिला आहे. 1215 उमेदवारांनी मैदान सोडल्यानंतर आता 11 हजार 353 उमेदवार रिंगणात आहेत. चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर ठाकले आहे. 15 जानेवारीला मतदान असून 18 ला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 

हेही वाचा - खवय्यांनो, बिनधास्त खा चिकन; पशुवैद्यक तज्ज्ञांचा हा सल्ला वाचाच

बिनविरोध ग्रामपंचायती -
भानखेडा, सावंगा (अमरावती), नांदसावंगी, सातरगाव, पिंपरी निपानी (नांदगावखंडेश्‍वर), ठाणाठुणी (तिवसा), येरड (चांदूररेल्वे), काशिखेड, निंभोरा बोडखा (धामणगावरेल्वे), दर्याबाद (अचलपूर), वडुरा (चांदूरबाजार), पाडा, लिहिदा (मोर्शी).   

हेही वाचा - बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या 'हे...

राजकीय हालचालींना वेग - 
नामांकनांची माघार, चिन्हा वाटप यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध क्‍लृप्त्या वापरण्यात येत आहेत, तर अनेकांनी तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचासुद्धा आधार घेतला आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकांनी ग्रामीण भागातील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. 
 

loading image