याच महिलांना मिळाले जन-धन! हे आहेत वंचित...

women.jpg
women.jpg

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये पंतप्रधान जन-धन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 500 रुपये रोख जमा केले आहेत. ही रक्कम काढण्यासाठी खातेधारक बॅंकांमध्ये गर्दी करत आहेत. परंतु जिल्ह्यातील एकूण 2 लाख 35 हजार 97 लाभार्थी महिलांपैकी केवळ ८७ हजार ३०० महिलांच्या खात्यातच ५०० रुपये जमा झाले आहेत. उर्वरित 1 लाख 47 हजार 797 महिलांच्या खात्यात अद्याप सानुग्रह राशी पोहचलीच नाही. 

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. लॉकडाऊनमुळे देशातील गरिबांवर उदरनिर्वाहाचे मोठे संकट आले आहे. या आपत्तीच्या काळात गरिबांनी उपाशी राहू नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत महिला जनधन खातेधारकांना पुढील 3 महिने 500 रुपये याप्रमाणे देण्यात येतील अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती. त्याअंतर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात प्रत्येकी 500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 2 लाख 35 हजार 97 लाभार्थी महिलांपैकी केवळ 87 हजार 300 महिलांच्या खात्यातच 500 रुपये सानुग्रह राशी जमा झाली आहे. उर्वरित लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. 

अशी आहे लाभार्थी महिलांची संख्या

  • एकूण लाभार्थी - 2 लाख 35 हजार 97 
  • सानुग्रह राशी प्राप्त - 87 हजार 300
  • सानुग्रह राशी अप्राप्त - 1 लाख 47 हजार 797
  • मिळणारी सानुग्रह राशी - 500 रुपये

सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरूच
पंतप्रधान जन-धन योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 500 रुपये रोख जमा करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत शनिवारपर्यंत 87 हजार 300 महिलांच्या खात्यात 500 रुपये सानुग्रह राशी जमा करण्यात आली आहे. उर्वरित 1 लाख 47 हजार महिलांच्या खात्यात सोमवारनंतर (ता. 7) रक्कम जमा करण्यात येईल. 9 एप्रिलनंतर सुद्धा नागरिक त्यांच्या बॅंकेतून रक्कम काढू शकतील. 
- आलोक तारेणिया, 
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com