esakal | दिवाळीचा फराळ घेऊन मावशीला भेटण्यासाठी निघाली लेक, पण वाटेतच काळाने केला घात
sakal

बोलून बातमी शोधा

16 years old girl died in accident at jamali of amravati

धारणी तालुक्‍यातील भुलोरी गावातील अस्मिता छगन भिलावेकर (वय.16) ही शासकीय कन्या शाळा, टेंब्रुसोंडा येथे नवव्या वर्गात शिकते. दिवाळीनिमित्त अस्मिता ही आपले आई, बाबा, आजी, आजोबांसह बैलबंडीने फराळाचे साहित्य घेऊन मावशीला भेटण्यासाठी निघाली होती.

दिवाळीचा फराळ घेऊन मावशीला भेटण्यासाठी निघाली लेक, पण वाटेतच काळाने केला घात

sakal_logo
By
मोहन गायन

जामली (जि. अमरावती ) : दिवाळीचा आनंद मनामध्ये साठवून आपल्या मावशीकडे फराळाचे साहित्य घेऊन जात असताना अचानक मुलीवर काळाने घाला घातला. बैलबंडीच्या चाकात ओढणी अडकल्याने एका 16 वर्षीय मुलीचा आई वडील तसेच आजी आजोबांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला.

हेही वाचा - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा...

धारणी तालुक्‍यातील भुलोरी गावातील अस्मिता छगन भिलावेकर (वय.16) ही शासकीय कन्या शाळा, टेंब्रुसोंडा येथे नवव्या वर्गात शिकते. दिवाळीनिमित्त अस्मिता ही आपले आई, बाबा, आजी, आजोबांसह बैलबंडीने फराळाचे साहित्य घेऊन मावशीला भेटण्यासाठी निघाली होती. वाटेत अचानक अस्मिताची ओढणी बैलगाडीच्या चाकात अडकली आणि तिच्या गळ्याला फास लागला.

हेही वाचा - मानवाच्या लाळेमध्ये आढळले पेनकिलर, मॉर्फिनपेक्षाही असते सहापट प्रभावी

गळ्याभोवती ओढणी अडकल्याने तिचा जीव गुदमरू लागला. अचानकपणे घडलेल्या या प्रसंगाने इकडे आई, वडील, आजी, आजोबा जिवाच्या आकांताने तिला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, अखेरपर्यंत ओढणी तिच्या गळ्यातून निघाली नाही आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला. मावशीला फराळ देण्याची इच्छा अपूर्णच राहिली. त्यानंतर तिचा मृतदेह गावाला नेण्यात आला.  या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.