
चार दिवस आधी तिवसा महसूल प्रशासनाला तालुक्यातील वरुडा दापोरी या परिसरात दोन बिबट दिसून आल्याने तालुक्यात जंगली जनावरांचा ठिय्या मानवी वस्तीकडे येत येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून भीती वर्तविली जात आहे
तिवसा (जि. अमरावती) : तालुक्यात बिबट दिसल्याने चांगलीच खळबळ उडाली असून काल संद्याकाळी 7वा तालुक्यातील विंचुरी तळेगाव ठाकूर शेतशिवारात एका बैलाची शिकार केल्याची घटना घडली तर सकाळी पहाटे माळेगाव शेत शिवारात एका लहान बछडाला जखमी केले 24 तासात एकाच परिसरात दोन जनावरांची शिकार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
चार दिवस आधी तिवसा महसूल प्रशासनाला तालुक्यातील वरुडा दापोरी या परिसरात दोन बिबट दिसून आल्याने तालुक्यात जंगली जनावरांचा ठिय्या मानवी वस्तीकडे येत येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून भीती वर्तविली जात आहे तालुक्याचा वनपरिक्षेत्र भाग हा मोठा असून जंगल परिसराने व्यापला आहे.
या भागात बिबट व इतर जनावरे नेहमीच शेतकऱ्यांचे नुकसान करतात काल तालुक्याच्या मौजा विंचुरी तळेगाव ठाकूर व माळेगाव या शेत शिवारातून दोन जनावराची शिकार झाल्याचे उघडकीस आले यामध्ये स्वप्नील देवडे यांच्या शेतात असलेल्या बैल जोडीतील एका बैलावर झडप घालून बैलाला ठार केले तर माळेगाव या शेत शिवारात भीमराव चव्हाण राहणार गुरुदेव नगर यांच्या शेतातील लहान वासराला जखमी केल्याने वासराचा मृत्यू झाला.
दोन्ही घटनास्थळाचा तिवसा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे 24तासात दोन जनावराची शिकार झाल्याने या भागात दहशतीचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये दिसत असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आव्हान वनविभागाकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा - ‘डाकू डब्बल सिंह झाला अक्कल सिंह’; यवतमाळच्या मातीत ‘शोले’चा रिमेक
तिवसा महसूल प्रशासनाला चार दिवसा आधी दिसलेल्या 2 बिबट्याची दहशत निर्माण झाल्याचे दिसत आहे एकाच दिवशी दोन जनावरांची शिकार झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे या बिबट्याला परिसरातून हाकलून लावावे किंवा जेरबंद करावे अशी मागणी आता या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
संपादन - अथर्व महांकाळ