esakal | कोरोना प्रतिबंधक नियमांचा भंग करणे पडले महाग, दोन रुग्णांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची नोटीस

बोलून बातमी शोधा

25 thousand rupees punishment notice to corona patients for violation of rules in amravati}

गृहविलगीकरणातील रुग्ण अनेकदा घराबाहेर पडून नियमभंग करतात. त्यामुळे त्यांच्या घरावर फलक लावावेत तसेच ते घराबाहेर पडून नियमभंग करत असतील तर नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन परिसरातील नागरिकांना करावे व तक्रारीनुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

कोरोना प्रतिबंधक नियमांचा भंग करणे पडले महाग, दोन रुग्णांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची नोटीस
sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती मिळण्यासाठी व गृहविलगीकरणाबाबत निर्णयांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार अमरावती शहरासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. दरम्यान, विलगीकरणातील रुग्णांनी नियमभंग केल्यास 25 हजार रुपये दंड करण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. त्यानुसार शहरातील दोन रुग्णांना दंडाची नोटीस जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा - मृत्यूला कवटाळताना दिले तिघांना जीवदान, वडिलांना सांगतानाही अश्रू आवरेना

गृहविलगीकरणातील रुग्ण अनेकदा घराबाहेर पडून नियमभंग करतात. त्यामुळे त्यांच्या घरावर फलक लावावेत तसेच ते घराबाहेर पडून नियमभंग करत असतील तर नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन परिसरातील नागरिकांना करावे व तक्रारीनुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पालिकेच्या पथकाने नियंत्रण कक्षाला प्राप्त तक्रारींवरून विद्यापीठ परिसर, रवीनगर, अमर कॉलनी परिसराला भेट देऊन गृहविलगीकरणातील रुग्णांकडून नियमभंग होतो किंवा कसे, याची तपासणी केली. त्यात दोन रुग्णांनी नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या दोघांनाही प्रत्येकी 25 हजार रुपये दंड ठोठावण्याची नोटीस जारी करण्यात आली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांच्यासह पालिका कर्मचारी व पोलिस शिपाई यांचा पथकात समावेश होता.

हेही वाचा - वायरलेस कंपन्यांना मिळणार 'फ्लेक्झिबल अ‌ॅन्टिना', नागपुरातील प्राध्यापिकेची भन्नाट आयडिया

गृहविलगीकरणासाठी संकेतस्थळ सुरू -                              
महापालिकेकडून नियंत्रण कक्षासह संकेतस्थळही सुरू आहे. गृहविलगीकरणासाठी अर्ज करण्यासाठी रुग्णांनी या कक्षाला रुग्णाच्या घरामधील व्यवस्था, स्वतंत्र राहण्याची सोय, त्यांना असलेली लक्षणे ताप, सर्दी, खोकला, ऑक्‍सिजन याबाबत माहिती द्यावी तसेच विलगीकरणाचा फॉर्म भरण्यासाठी संकेतस्थळ वापरावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.