bill final
bill final

विधवा महिलेला महावितरणने पाठवले 27 हजारांचे बिल... आता बोला

चांदुर रेल्वे(जि. अमरावती) : हजारो रुपयात येणाऱ्या वीज बिलाचा नागरिकांनी सध्या धसकाच घेतला असून यासंबंधीच्या अनेक तक्रारी एकामागोमाग येत आहेत. विविध ठिकाणी महावितरण विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून आंदोलने सुरू आहेत.

संपूर्ण राज्यात महावितरणने पाठविलेल्या वीज बिलामुळे गोंधळ उडाला असतांनाच तालुक्‍यातील बासलापूर येथील एक विधवा व शासनाच्या घरकुलात राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला तब्बल 27 हजार 700 रुपये इतके बिल महावितरणने पाठविले आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटाने आधीच आर्थिक तोटा सहन करणाच्या परिस्थितीत असे अव्वाच्या सव्वा बिल पाहून आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे निवेदन त्या महिलेने तहसीलदार व आमदार प्रताप अडसड यांना दिले आहे.

श्रीमती चंदा दादाराव बोबडे असे त्या पीडित महिलेचे नाव असून त्या विधवा आहेत. एक मुलगा व सून असे तीन जणांचे हे कुटुंब असून ते शासनाच्या घरकुलामध्ये राहतात, फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना 2070 इतके बिल आल्याने त्यांनी ते प्रामाणिकपणे भरून मीटर बदलवून घेतले होते पण त्यानंतर मार्चचे बिल सुद्धा 4220 इतके आले त्या कुटुंबाने पुन्हा तक्रार केली पण नंतर लॉकडाऊन लागल्याने 3 महिने कुठलेही बिल आले नाही व आता आलेले तब्बल 27 हजार रुपयांचे आहे.

यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असत आधी पूर्वीचे हे बिल भरा नंतर पाहू असे उत्तर महावितरणने त्यांना दिले असल्याचे निवेदनात नमूद आहे. यावरून त्या कुटुंबाने आमदार प्रताप अडसड यांच्याकडे धाव घेत आपली कैफियत मांडली. त्यावर आपण महावीतरणाशी चर्चा करून काय गडबड आहे ते पाहणार असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले.

ठळक बातमी - मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा...

माझ्यापर्यंत तक्रार नाही
सध्या माझ्यापर्यंत त्यांची तक्रार आली नाही सोमवारी सदर प्रकरण पाहून काय करता येईल ते करणार असल्याचे महावितरणचे शाखा अभियंता श्री बीजवे यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com