esakal | ..आणि ही पिकनिक ठरली अखेरची; भरधाव क्रूझर झाडाला धडकली..  तरुणांनी जागीच सोडले प्राण 
sakal

बोलून बातमी शोधा

3 boys are no more in road accident in amravati district

माहितीनुसार धारणी येथून परतवाड्याच्या दिशेने निघालेल्या क्रूझर गाडीमध्ये (क्रमांक : एमएच ३०-एटी १९२७) सहा युवक प्रवास करीत होते. हे वाहन अंबिका लॉनजवळ एका झाडावर जाऊन आदळले. हे सर्व जण मेळघाटला पिकनिकसाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. 

..आणि ही पिकनिक ठरली अखेरची; भरधाव क्रूझर झाडाला धडकली..  तरुणांनी जागीच सोडले प्राण 

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : धारणी ते परतवाडा मार्गावरील अंबिका लॉनजवळ भरधाव क्रूझर गाडी झाडावर आदळल्याने तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. दोन) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 

मृतांमध्ये चालक वैभव गुलाबराव नागरे (वय २६), धीरज अशोक गिरी (वय २९) व कृष्णा राजेंद्र दळवी (वय २३) यांचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार धारणी येथून परतवाड्याच्या दिशेने निघालेल्या क्रूझर गाडीमध्ये (क्रमांक : एमएच ३०-एटी १९२७) सहा युवक प्रवास करीत होते. हे वाहन अंबिका लॉनजवळ एका झाडावर जाऊन आदळले. हे सर्व जण मेळघाटला पिकनिकसाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. 

हृदयद्रावक! पोहण्याचा आवरला नाही मोह म्हणून उतरले पाण्यात आणि काळाने केला घात

 या अपघातात तीन जणांना जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून जखमी युवकांची अवस्थादेखील गंभीर आहे. जखमींना रात्री अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील सर्वजण अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गंभीर जखमींना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा तपास ठाणेदार सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

देवा रे देवा! काय झाले मोसंबीच्या बागांना, रात्रभरात फळे गेली कुठे? वाचा..

गंभीर जखमींमध्ये कुणाल बाळू दहीकर (वय २४), प्रथमेश सुभाष कंटाळे (वय २०), प्रतीक सुनील मेहरे (वय २६) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गंभीर जखमींना अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ