बोगस खतांच्या ३०० बॅग जप्त, घाटंजीतील प्रकार

ghatanji
ghatanjie sakal

यवतमाळ : घाटंजी (ghatanji yavatmal) तालुक्यातील पारवानजीकच्या काळेश्वर गावात बोगस खत जप्त करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात साधारण: तिनशेवर खताच्या बॅग (fake fertilizer) अंदाजे ४ लाख रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया चालू केली आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या (agriculture department) अधिकाऱ्यांनी केली. (300 bags of fake fertilizer seized in yavatmal)

ghatanji
रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी : मेडिकलचे मुख्यप्रवेशद्वार बंद

घाटंजी तालुक्यातील काळेश्वर येथून खत येत असल्याची गोपनिय माहिती कृषी विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर कृषी विभागाने सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात खताचे पोते आढळून आले. तद्नंतर कारवाई करून संबंधिताना लगेच ताब्यात घेतले. आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यात तब्बल तिनशेवर अप्राणित खताच्या बॅग होत्या. एक हजार ३७५ रूपये प्रमाणे तिनशे बॅग मिळून जवळपास चार लाखाहून अधिक रूपयांचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान, रात्रीच्या सुमारास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तर रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरूच होती. वृत्त लिहीपर्यंत आरोपीचे नाव कळू शकले नाही. ही कारवाई एसएओ नवनाथ कोळपकर, मोहीम अधिकारी राजेंद्र माळोदे, पंकज बरडे, लक्ष्मण लखमोड यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com