महामंडळाच्या 38 बसेसची विक्री; लिलाव प्रक्रियेतून तब्बल 64 लाख उत्पन्नाची अपेक्षा

38 buses are sold of MSRTC 64 lakhs expected in auction
38 buses are sold of MSRTC 64 lakhs expected in auction

अमरावती ः निरुपयोगी व चालविण्यायोग्य नसलेल्या 38 एसटी बसेस विक्री करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती आगाराने घेतला आहे. लवकरच लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून या बसेसच्या विक्रीतून 64 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे, असे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.

सद्यःस्थितीत अमरावती बस आगारात सुस्थितीत 83 बसेस उपलब्ध आहेत. काही बसेसची जीवनमर्यादा संपली आहे. त्या आउटडेटेड झाल्या असून दुरुस्तीयोग्य नाहीत. त्या बसेस विकण्यात येणार आहेत.

 या बसेसचे इंजिन व महत्त्वाचे भाग काढून केवळ चेसीस व बॉडी चक्‍क्‍यांसह लिलाव करण्यात येणार आहे. प्रती बसपासून 1 लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. लिलावात प्रत्यक्ष बोलीत यामध्ये चढउतार होण्याची शक्‍यता आहे.

लिलावात बसेस विकून येणाऱ्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व बांधकाम दुरुस्तीसह अन्य महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत. आगारात सध्या 83 सुस्थितीतील बसेस असून नादुरुस्त व निकामी झालेल्या 38 बसेस आधीच आगारातून हटविण्यात आल्या आहेत, असे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.

आगारातील सर्व बसेस फीट

अमरावती आगारात सध्या उपलब्ध असलेल्या सर्व बसेस प्रवाशांसाठी फीट आहेत. त्यांच्या देखरेख व दुरुस्तीवर विशेष लक्ष दिले जात असून ज्या बसेसची कालमर्यादा संपली अशाच बसेस लिलावात काढण्यात येत आहेत. या बसेसचा लिलाव नोव्हेंबरमध्ये होणार आहे, असे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.


संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com