अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान, ३५ हजार मतदार ठरविणार २७ उमेदवारांचे भवितव्य

सुरेंद्र चापोरकर
Tuesday, 1 December 2020

अमरावती शिक्षक मतदारसंघाची व्याप्ती पाच जिल्हे असून मागील एका महिन्यापासून विभागातील 56 तालुक्‍यांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. मतदानासाठी 77 मतदान पथके व 15 राखीव पथक तयार करण्यात आले आहे.

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवारी (ता.1) होत आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या 27 उमेदवारांचे भवितव्य 35 हजार मतदार ठरविणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 900 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून विभागातील पाचही जिल्ह्यात 77 मतदानकेंद्र राहणार आहेत.

हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

अमरावती शिक्षक मतदारसंघाची व्याप्ती पाच जिल्हे असून मागील एका महिन्यापासून विभागातील 56 तालुक्‍यांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. मतदानासाठी 77 मतदान पथके व 15 राखीव पथक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये 27 झोनल अधिकारी, 77 मतदान केंद्राध्यक्ष, 154 पोलिस कर्मचारी, 92 सुक्ष्म निरीक्षक, 231 आरोग्य अधिकारी, 92 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 

हेही वाचा - बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ....

धोकादायक मतदारांसाठी एक तास सुविधा -
प्रत्येक मतदानकेंद्रावर कोविड 19 च्या सुरक्षात्मक तथा प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी मतदारांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. शारीरिक तापमान विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास संबंधित मतदाराला दुपारी 4 ते 5 या वेळेत मतदान करण्याची मुभा राहील. 

हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही...

पथके रवाना - 
संपूर्ण 77 मतदानकेंद्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून साहित्याचे संच तयार करून ते उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. सोमवारी (ता.30) पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांच्या पथकाला रवाना करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today is voting for amravati teacher constituency election