कोरोना लशीचे ४० हजार डोज शिल्लक; नागपूर जिह्यात आतापर्यंत लाख डोज दिले

40,000 doses of corona vaccine remaining corona vaccine news
40,000 doses of corona vaccine remaining corona vaccine news

नागपूर : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यांसाठी या दोन-अडीच महिन्यांत कोविशिल्डचे सव्वाचार लाख तर कोव्हॅक्सिन लशीचे सुमारे ५५ हजार डोस प्राप्त झाले आहेत. विशेष असे की, नागपूर जिल्ह्याला सर्वाधिक एक लाख ४० हजार डोस मिळाले आहेत. यापैकी सुमारे एक लाख डोस आतापर्यंत हेल्थवर्कर, फ्रन्ट लाइन वर्कर तसेच ज्येष्ठांना देण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण विविध टप्प्यात सुरू झाले. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातील सहा जिल्हयात नोंदणी केलेल्या ९३ हजारावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा संकल्प केला होता. यात क्टरांपासून चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या संवर्गातील कर्मचारी आहे. यानंतर फ्रंन्ट लाईन वर्करचे लसीकरण झाले. तिसऱ्या टप्प्यात पन्नास वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सद्या पूर्व विदर्भात लसीचा आवश्यक तो साठा उपलब्ध आहे.

कोविशिल्ह आणि कोव्हॅक्सिन कंपनीच्या लस निर्मितीच्या क्षमतेनुसार लस तयार होत आहेत. मागणीप्रमाणेच लस निर्मिती सुरू आहे. मागणीच्या तुलनेत मिळालेल्या लसीचा डोस सुरू आहे. यामुळे तुटवडा निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. कोरोना महामारीची प्रचंड झळ सहन करणाऱ्या नागपूर जिल्ह्यासाठी आतापर्यंत १ लाख ४० हजार कोविशिल्ड लस आरोग्य कर्मचाऱ्यांसह, फ्रन्टलाईन वर्कर तसेच ज्येष्ठांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याशिवाय कोव्हॅक्सिन लस मेडिकलसह भंडारा, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत. यात मेडिकलमध्ये आतापर्यंत सुमारे ५ हजार, भंडारा वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रत्येकी ७ हजार लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

असे मिळाले आहेत कोविशिल्डचे डोस 

जिल्हा डोस
नागपूर नागपूर ः १ लाख ४० हजार
भंडारा २३ हजार
चंद्रपूर ४९ हजार
गडचिरोली ४२ हजार
गोंदिया २६ हजार
वर्धा ४९ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com