esakal | दारू मिळाली नाही म्हणून चक्क सॅनिटायझरची पार्टी, ५ तरुणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

corona dead
दारू मिळाली नाही म्हणून चक्क सॅनिटायझरची पार्टी, ५ तरुणांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वणी (यवतमाळ) : दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याने ५ तरुणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील वणी येथे ही घटना घडली असून दोन दिवसांपूर्वी देखील दारूची तल्लफ भागविण्यासाठी दोघांनी सॅनिटायझर प्यायले होते. त्यामुळे मृतांचा आकडा एकूण ७ वर पोहोचला असून या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ माजली आहे.

हेही वाचा: पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

दत्ता कवडू लांजेवार 47 रा. तेली फैल, नुतन देवराव पाटनकर 35 रा. ग्रामीण रुग्णालयाजवळ, संतोश मेहर 35 रा. एकता नगर, विजय बावणे 35 असे दगावलेल्या तरुणांचे नावे आहेत. यातील एकाचे नाव बालू असल्याचे बोलले जात आहे, तर दोन दिवसांत दगावलेल्या तरुणांतील केवळ दोघांचे शव विच्छेदन करण्यात आले असून पोलिस दप्तरी त्यांची नोंद करण्यात आली आहे. परंतु, अन्य मृतकांच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हेही वाचा: ऑनलाइन प्रेमातून मुलीला मारण्याचा प्रयत्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सोबतच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे दारू दुकाने बंद आहेत. तर लपुनछपून चढया दराने विकल्या जात असलेली दारु पिणे न परवडणारे आहे. त्यामुळे व्यसनी तरुण सॅनिटायझरचा वापर नशेसाठी करीत असल्याचे समोर आले आहे. शहरातील विविध भागातील व्यसनी तरुण शुक्रवारी एकत्रित आले आणि सॅनिटायझर पार्टीचा बेत आखला. 30 मीली सॅनिटायझरची नशा एका निप एवढी होत असल्याचा कांगावा करीत त्यांनी मोठया प्रमाणात सॅनिटायझर विकत घेतले. या पार्टीत किमान 6 ते 7 युवक असल्याचे बोलल्या जात असून त्यांनी मनसोक्त सॅनिटायझर प्राशन केले. काही वेळाने त्यांना मळमळ व उलटया व्हायला लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्या तरुणांना येथील ग्रामीण रुग्णांलयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सॅनिटायझर प्राशन करण्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. 23 एप्रिलला शहरातील जैताई नगर येथे वास्तव्यास असलेले गणेश उत्तम शेलार वय 43 तर सुनिल महादेव ढेंगळे वय 36 रा.देशमुखवाडी असे दोघे दगावले होते, तर शनिवारी तब्ब्ल 5 तरुणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन शहरातील अल्कोहोलीक व्यसनी व्यक्ती जीवाची पर्वा न करता सॅनिटायझर प्राशन करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.