धक्कादायक! निवासी शाळेतील तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोनाचा विळखा; पुन्हा हॉटस्पॉट बनलं हिंगणघाट 

75 students in hostel are tested corona positive in Hinganghat Wardha
75 students in hostel are tested corona positive in Hinganghat Wardha

हिंगणघाट (जि. वर्धा) : तालुक्‍यातील सातेफळ मार्गावरील निवासी शाळेतील 247 विद्यार्थ्यांची अँटीजन टेस्ट गुरुवारी केली असता 45 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले. या शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या 75 वर पोहोचली आहे. तर 1 विद्यार्थी व 9 कर्मचाऱ्यांचा आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

बुधवारी याच निवासी शाळेतील 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या शाळेतील 247 विद्यार्थी आणि 30 कर्मचाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यातील 45 विद्यार्थी या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचवेळी 30 कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 

या सर्व विद्यार्थ्यांना एका वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याच शाळेतील आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या 1 विद्यार्थी व 9 कर्मचाऱ्यांचा चाचणी अहवाल अप्राप्त असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किशोर चाचरकर यांनी दिली. हिंगणघाट तालुका पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनल्याने यावर नियंत्रण मिळविणे आरोग्य यंत्रणेसमोर आवाहन ठरत आहे.

भीती न बाळगता सावधानी बाळगा : डॉ. कुचेवार

कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी एकाच वसतिगृहातील आहे. त्यांना विलगीकरणात ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. इतर विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी भीती न बाळगता सावधानी बाळगावी तरच कोरोनावर नियंत्रण आपण ठेऊ शकतो, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी कुचेवार दिघे यांनी केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com