esakal | गावगाड्यात मतदानाचा उत्सव; चंद्रपूर जिल्ह्यात 604 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 80 टक्के मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

80 percent voting done for gram panchayat elections in Chandrapur

कोरोनाचे संकट ओसरत असताना ग्रामीण भागात निवडणुकीच्या निमित्ताने उत्सव बघायला मिळाला. निवडणुकीसाठी 11 हजार 319 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. सकाळी मतदानाला 7.30 वाजता प्रारंभ झाला. दुपारी तीन वाजता मतदान सरासरी 64 टक्के झाले

गावगाड्यात मतदानाचा उत्सव; चंद्रपूर जिल्ह्यात 604 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 80 टक्के मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर ः जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शुक्रवारला मतदान पार पडले. मतदानाची सरासरी 80 टक्के आहे. अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. निवडणुकीच्या रिंगणात 11 हजार 364 उमेदवार आहेत. मतमोजणी 18 जानेवारीला होईल.

कोरोनाचे संकट ओसरत असताना ग्रामीण भागात निवडणुकीच्या निमित्ताने उत्सव बघायला मिळाला. निवडणुकीसाठी 11 हजार 319 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. सकाळी मतदानाला 7.30 वाजता प्रारंभ झाला. दुपारी तीन वाजता मतदान सरासरी 64 टक्के झाले. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. सकाळी ग्रामीण भागातील नागरिक शेतीच्या कामाला गेल्याने मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. मात्र, सायंकाळी चार वाजेनंतर चित्र बदलले. मतदान केंद्रासमोर चिक्कार गर्दी बघायला मिळाली. मतदानाची सरासरी 80 टक्‍क्‍यांवर पोहोचण्याना अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हाभरात मतदान शांततेत पार पडले. त्याचवेळी काही ठिकाणी गालबोट लावण्याचेसुद्धा प्रकार झाले.

अधिक माहितीसाठी - मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ

चिमूर तालुक्‍यातील मोटेगाव येथे एका बूथ समोरील गर्दी पांगविताना पोलिस आणि गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. यातूनच एका पोलिसाला मारहाण करण्यात आली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांची जादा कुमक बोलवावी लागली. मयूर दडमल, भगवान रामटेके, रवींद्र खोब्रागडे यांना पोलिसांनी अटक केली. नागभीड जवळच्या पारडी ठवरे गट ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या कोसंबी चक येथील 120 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. 

मतदान केंद्र सहा किलोमीटर अंतरावर असल्यामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. कोरपना तालुक्‍यातील आसन येथील मतदान केंद्रावर मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. दोन हजार पोलिस मतदान केंद्रांवर तैनात राहणार आहे. निवडणुकीसाठी दोन हजार पोलिस कर्मचारी, आठशे होमगार्ड, एसआरपीएफची एक तुकडी, सी-60 जवान, बाह्य जिल्ह्यातील 85 पोलिसांची निवड केली आहे. मतमोजणी 18 जानेवारी रोजी होईल. जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणुका होत आहेत. त्या क्षेत्रात शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार पुढे ढकलण्यात आला.

नक्की वाचा - नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'

तापमान मोजण्याची सुविधा

मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांचे तापमान मोजले जात होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करीत मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली.

संपादन - अथर्व महांकाळ