दिव्यांग महीलेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीस कोठडी (व्हिडिओ पहा)

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

एका दिव्यांग अविवाहित अपंग महिलेवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या नराधमाने दारूच्या नशेत अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केली. पोलिसांनी आरोपीला श्वान पथकाच्या मदतीने काही तासातच जेरबंद केले. आरोपी रितेश देशमुख (वय 30) यास पोलिसांनी रविवारी 8 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जळगाव जामोद (जि.बुलडाणा) :  हैद्राबाद, उन्नव घटना ताजी असतानाच काल सात डिसेंबर रोजी तालुक्यातील खेर्डा येथे समाजमन हेलावून ठेवणारी घटना घडली. एका दिव्यांग अविवाहित अपंग महिलेवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या नराधमाने दारूच्या नशेत अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केली. पोलिसांनी आरोपीला श्वान पथकाच्या मदतीने काही तासातच जेरबंद केले. आरोपी रितेश देशमुख (वय 30) यास पोलिसांनी रविवारी 8 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

व्हिडिओ पहा -

सहा डिसेंबरचे रात्री खेर्डा येथील 52 वर्षीय महिला चुलत भावाचे घरात झोपली असता मध्यरात्रीच्या दरम्यान तिच्या शेजारी राहणारे रितेश गजानन देशमुख याने मध्यरात्री दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घुण खून केला, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांचेसह अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे यांच्यासह ठाणेदार सुनील जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. श्वान पथकास सुद्धा तात्काळ पाचारण केले .फॉरेन्सिक लॅब, व्हॅन सुद्धा घटनास्थळी बोलावली आणि काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले.

गंमतच आहे! - विदेशी पाहुणा बार हेडेड गुजचे अकोला जिल्ह्यात दर्शन

आरोपीला कठोर शिक्षा करा
या प्रकरणात एका अपंग अविवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करून आरोपीने तिचा निर्घृण व अमाणूषपणे खून केला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असला तरी अपंग कायद्यानुसार त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी ही शिक्षा फाशीच्या शिक्षेत परावर्तित करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. सदर निवेदनावर सौ. चंदाताई पुंडे, धनगर महासंघाचे प्रदेश सरचिटणीस भारत वाघ, गंगाराम कोकरे, रामकृष्ण खरात, भाऊराव खरात, शिवसेना जिल्हासह संपर्क प्रमुख दत्ता पाटील, तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ, काँग्रेस ता अध्यक्ष अविनाश उमरकर ,डॉ संदीप वाकेकर ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, मनोहर खाडपे,अश्विन बंबटकर, प्रमोद सपकाळ ,अशोक साबे ,राम इंगळे, बाळू कुटे,े विलास पुंडे ,अब्दुल जहीर, गजानन गावंडे ,सुनील भिवटे, चंद्रकांत माने ,भारत वाघ, रमेश इलामे, विलास बोंद्रे ,डॉक्टर शाकीर खान, आशिफ इक्बाल यांच्यासह बहुसंख्य नागरिकांच्या सह्या आहेत.

उघडून तर बघा - मोठ्या शिताफिनं पाकीट मारलं, अन मजूरीही नाही निघली

आरोपीला वकिलांनी सहकार्य करू नये
खेर्डा खुर्द येथे एका नराधमाने अविवाहित, अपंग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेमुळे तालुक्याचे नाव चर्चेत आले आहे. यापूर्वी असले घाणेरडे प्रकार आपल्या परिसरात घडले नाहीत. एका अपंग महिलेवर या नराधमाने मोठा अत्याचार केला आहे. त्यामुळे या आरोपीचे वकील पत्र कुण्याही वकील बांधवांनी घेऊ नये, अशी विनंती प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष नारायण महाले यांनी वकील मंडळींना केली आहे.

आनंद वार्ता - ...त्या शेतकऱ्यांचेही सावकारी कर्ज होणार माफ! 

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर न्यायालयात आरोपपत्र
आरोपी ने केलेला गुन्हा हा गंभीर असून मानवतेला काळीमा फासणारा आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उप अधिक्षक यांचे मार्गदर्शनात पोलीस तपास हा सकारात्म दिशेने सुरू आहे.  पोलीस कस्टडी काळात आरोपीचा कसून तपास करून मृतक अपंग महिलेस शत प्रतिशत न्याय मिळेल. असे आश्वासन ठाणेदार सुनील जाधव यांनी दिले. अमरावती येथून फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त होताच न्यायालयात आरोपपत्र पण दाखल केल्या जाईल.
- सुनील जाधव, पोलीस निरीक्षक, जळगाव जामोद (जि.बुलडाणा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused of murdering and torturing woman