एकतर्फी प्रेम करणारा मजनू म्हणाला, 'लग्न कर, नाहीतर मरायला तयार राहा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

"एक तर माझ्याशी लग्न कर अन्यथा मरायला तयार राहा' अशा शब्दात त्याने युवतीला धमकी दिली. यापूर्वीही शिवचरणने युवतीची अनेकदा छेडखानी करून दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता. अचलपूर पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून शिवचरणविरुद्ध विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

अमरावती : शिवचरण वासुदेव वखरे (वय 30) हा परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय युवतीवर एकतर्फी प्रेम करीत होता. एकतर्फी प्रेमातून त्याने अनेकदा युवतीचा पाठलाग करून प्रेमाची मागणी केली. मात्र, युवतीने स्पष्ट शब्दात नकार दिला. तरीही शिवचरणने युवतीचा पाठलाग करणे सोडले नाही. त्याने अनेकदा युवतीचा रस्त्यावर थांबवून विनयभंग केला. एकेदिवशी त्याने थेट युवतीचे घर गाठून धमकी दिली. यामुळे युवतीने अचलपूर पोलिस ठाणे गाठून शिवचरणविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना अचलपूर येथील विलायतपुरा परिसरात घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवचरण वखरे परिसरातील 26 वर्षीय युवतीचा नेहमी पाठलाग करीत होता. तो तिला नेहमी रस्त्यावर थांबवून प्रेमाची मागणी घालत होता. मात्र, युवती त्याच्याकडे व त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती. यामुळे शिवचरण चांगलाच चिडला होता. युवतीने आपल्या प्रेमाला नकार दिल्याच्या राग त्याच्या मनात होता. यामुळे तो युवतीला धडा शिकवण्याचा विचार करीत होता.

अधिक वाचा - कारागृहातून सुटला अन् थेट मित्राच्या आईचा चिरला गळा... हे आहे कारण

एकेदिवशी त्याने थेट युवतीचे घर गाठले. तुझ्याकडे दोनच पर्याय शिल्लक असल्याचे त्याने सांगितले. "एक तर माझ्याशी लग्न कर अन्यथा मरायला तयार राहा' अशा शब्दात त्याने युवतीला धमकी दिली. यापूर्वीही शिवचरणने युवतीची अनेकदा छेडखानी करून दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता. अचलपूर पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून शिवचरणविरुद्ध विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

दिली 'बाबा'ची धमकी

एकतर्फी प्रेम करणाऱ्या शिवचरणने थेट युवतीचे घर गाठून लग्नासाठी धमकी दिली. तसेच युवतीसह अन्य दोघांचे फोटो एका बाबाकडे पाठविले असल्याची बतावणी केली. बाबा सांगेल तिला माझी गोपी बनवून देईल असेही त्याने युवतीला म्हटले. यामुळे भयभीत झालेल्या युवतीने अचलपूर ठाण्यात दाखल तक्रारीत दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा - या शहरातील मुस्लिम परिसर मनपाने केला 'सील', हे कारण ठरले कारणीभूत
 

छेडखानीचे प्रकार नित्याचेच

एकतर्फी प्रेमप्रकरणातून युवतीची छेडखानी, धमकी देणे, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरूच आहेत. यात कोणत्याही प्रकारची घट झालेली नाही. यामुळे एकतर्फी प्रेम करणारे तसेच रोडछाप मजनूंची हिंमत चांगलीच वाढली आहे. यामुळे शिवचरणने थेट युवतीचे घर गाठून "लग्न कर, नाही तर मरायला तयार राहा' अशी धमकी दिली. अचलपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र, अशा मजनूंवर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused of threatening girl in Achalpur in Amravati