
अचलपूर घटनेमागे यशोमती ठाकूर मास्टरमाइंड; भाजप नेत्याचा आरोप
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (Achalpur) येथे झेंडा काढण्यावरून दोन गटात (Amravati Achalpur Violence) झालेल्या घटनेमागे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) मास्टरमाइंड असल्याचा आरोप भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केला आहे. अचलपूर घटनेच्या विरोधात भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली त्यावेळी बोंडे यांनी वरील विधान केले आहे. सध्या अचलपूर (Achalpur Stone Pelting) येथे तणावपूर्ण शांतता असून जमावबंदीचे आदेश कायम आहे. यामागे भाजप पदाधिकारी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी भाजप (BJP) शहराध्यक्ष अभय माथणे यांना पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. (Achalpur Violence News)
हेही वाचा: धार्मिक स्थळांवरील भोंग्यावर कारवाई टाळल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार
बोंडे म्हणाले की, अचलपूर घटनेमागे अभय म्हात्रे हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, या घडलेल्या घटनेमागे पालकमंत्री आणि मंत्री यशोमती ठाकूर याच मास्टरमाईंड आहेत. यावेळी त्यांनी 12 नोव्हेंबर रोजी घडलेली घटना आणि त्यानंतर मातंग समाजाच्या मुलांनी काश्मीर फाईल बघिल्यानंतर केलेल्या भारत माता की जय घोषणेनंतर झालेला हल्ला या सर्व घटनांमागे यशोमती ठाकूर याच असल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे.
हेही वाचा: आर्थिक संकटातील श्रीलंकेला भारतानं केलेल्या मदतीचं IMFकडून कौतुक
याबाबत अतुल लोंढे म्हणाले की, अल कायद्याचे जिहादी असल्यासारखे बोंडे सध्या अमरावती जिल्ह्यात वागत आहेत. मागच्या वेळी घडलेल्या दंगलीच्यावेळी बोंडेंना अटक करण्यात आली होती. या सर्व घटनांमागे भाजपचाच हात असून, दिल्लीत तिन्ही महापालिका एकच करण्यात आल्या असून, आता त्या निवडणुका होणार आहेत त्या आधी दिल्लीतील घटना घडली आहे. भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश असून, देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नांकडे भाजपने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. राज्यातील कोणत्याही पक्षातर्फे चुकीचं विधान करणं अशोभनीय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच भाजप सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोपही यावेळी लोंढे यांनी केला आहे.
हेही वाचा: राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांना पत्र; बैठकीनंतर नांदगावकरांची माहिती
नेमकं काय आहे प्रकरण? -
अचलपूर शहरातील खिडकी गेट आणि दुल्हागेट येथील ब्रिटीशकालीन दरवाजांवर दरवर्षी सण-उत्सवप्रसंगी शहरातील नागरिक झेंडे व फ्लेक्स लावतात. यावर्षीसुद्धा झेंडे लावण्यात आले होते. मात्र रविवारी सायंकाळी दहा वाजताच्या सुमारास काही असामाजिक तत्त्वांनी तेथील झेंडा काढल्याने वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत बदलून दोन गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेकही केली. घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी मिळून कारवाई केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात. पोलिसांनी २३ जणांना अटक केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांनी दिली.
Web Title: Achalpur Controversy Yashomati Thakur Mastermind Behind The Incident Says Bjp Leader Anil Bonde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..