तब्बल आठ महिन्यांपासून सुरु होता रक्त तपासणीचा गोरखधंदा; अखेर पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई

प्रशिक मकेश्वर 
Friday, 16 October 2020

 तक्रारदारानी तक्रार करून नगरपंचायत प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा तिवसा नगरपंचायतच्या आरोग्या पथकाने या लॅब मालका विरुद्ध कारवाई करत लॅब सील करत कारवाई केली. 

तिवसा (जि. अमरावती) :  शहरातील मुख्य बाजारपेठ येथे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून वैद्यकीय लॅबची कुठलीही पदवी न घेता अनधिकृतपणे लॅब चालवत लोकांचे रक्ता, लगवी इतर तपासण्या केल्या जात होत्या त्यामुळे लॅब विषयी शहरातील एका तक्रारदारानी तक्रार करून नगरपंचायत प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा तिवसा नगरपंचायतच्या आरोग्या पथकाने या लॅब मालका विरुद्ध कारवाई करत लॅब सील करत कारवाई केली. 

सध्या कोरोनाच भयं जिल्ह्यातून ग्रामीण भागात मोठे जाळे पसरत असून नागरिक आता आरोग्याची काळजी घेत असल्याचे दिसत आहे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजाराची लागणं असून चांगल्या प्रकारे तपासण्या व्हाव्यात यासाठी नागरिक खाजगी लॅबकडे धाव घेत आहे मात्र याच खाजगी लॅब अधिकृत आहेत का, वैद्यकीय लॅब चे शिक्षण लॅब मालकाचे झाले आहे का यासह इतर प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. 

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

त्यामुळेच तिवसा शहराच्या बाजारपेठ मध्ये गेल्या काही महिन्यापासून श्रुशाता पोथलॉजी लॅब नावाने अवैधरिता लॅब टाकून नागरिकांच्या रक्ताच्या, लघवी अश्या इतर तपासण्या करून पैसे उकळण्याचा छुपा धंदा चालू असल्याने शहरातील एका जागरूक नागरिकांने या संधर्भात तिवसा नगरपंचायतला तक्रार करत कारवाईची मागणी केली होती त्यामुळे काल तिवसा नगरपंचायतच्या आरोग विभागाने धडक कारवाई करत ही लॅब सील केली. 

ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली यावेळी आरोग्य विभागाच्या प्रमुख अश्विनी खिराडे, दीपक खोब्रागडे, सुधीर विघ्ने, सचिन मकेश्वर, मंगेश कंठाने, सचिन देशमुख, व आरोग सभापती धनराज थूल उपस्थित होते. या कारवाईमध्ये हस्तगत केलेल्या बाबी तिवसा नगरपंचायत तपासून पाहत आहे. 

लॅब एमपीसीबीचे कुठलेच प्रमाणपत्र नाही

या कारवाईमध्ये काही गोष्टी उघडकीस आल्या असून लॅब मालक शाम जोशी असून त्यांचे इंजिनियरचे शिक्षण झाले आहे, ते रोज अमरावती वरून येऊन तिवसा शहरात ही लॅब चालवत होते, लॅब एमपीसीबीचे कुठलेच प्रमाणपत्र त्यांच्या कडे आढळून आले नाही तर तपासण्या करत नागरिकांना लेटरपॅडवर लिहून नागरिकांची दिशाभूल जोशी करत होते तर रक्त व इतर तपासण्या करत लॅबच्या काचऱ्याचे नियोजन करत नसल्याने याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत होता. 

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

शहरात अनधिकृत, नोंदणीकृत नसलेल्या सोबतच रुगणांचे रक्त,लघवी,थुंकी चे नमुने सार्वजनिक नाल्यामधे सोडून अप्रशिक्षित लॅब कर्मचारी नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकत असल्याची तक्रार व पुरावे प्राप्त झाले होते, न प आरोग्य विभागाच्या विभाग प्रमुखांनी ही लॅब सिल करत कारवाई केली आहे. 
- वैभव वानखडे 
नगराध्यक्ष न प तिवसा.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against fraud pathology lab in Amravati district