
शासनाने तीन जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. यादिवशी पुरस्कार वितरण करावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली होती.
अमरावती : विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळूनसुद्धा शिक्षण विभागाकडून अद्यापही आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त साधण्यात आला नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात आली होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही.
हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
शासनाने तीन जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. यादिवशी पुरस्कार वितरण करावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या यादीला मंजुरी मिळाली नव्हती. आता यादी मंजूर झाली असून कार्यक्रमाचे नियोजन शिक्षण विभाग करू शकले नाही. पाच सप्टेंबरला दिले जाणारे आदर्श पुरस्कार तीन जानेवारी तसेच प्रजासत्ताकदिनीसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. 14 प्राथमिक तसेच एक माध्यमिक शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
हेही वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला
पुरस्कार प्राप्त शिक्षक -
प्राथमिक विभागातून बबलू कराडे, शहाजहॉं परवीन, मो. याकुब, वैशाली सरोदे, लखन जाधव, मंगेश वाघमारे, मनोज वानखडे, उमेश आडे, किशोर बुरघाटे, योगीता भुमर, प्रियंका काळे, अहमदखान पटेल, सचिन विटाळकर, नंदकिशोर पाटील तसेच माध्यमिक विभागातून किशोर इंगळे यांचे नाव जाहीर झाले आहे.