खुनाचे रहस्य उलगडले : पोलिसांनी नदीपात्राजवळ शोध घेतला असता सापडले फक्त शरीराचे काही अवशेष

After killing one in Amravati the body was cremated Crime marathi news
After killing one in Amravati the body was cremated Crime marathi news

परतवाडा (जि. अमरावती) : जुन्या वैमनस्यातून आठवडीबाजारातून अपहरण केल्यानंतर गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला व त्याची विल्हेवाट मध्य प्रदेशात लावली. परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली.

शेख रफीक (वय २२) असे हत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सुबेदा बानो शेख युसूफ (वय ६०, रा. हिरापुरा, अचलपूर) यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सचिन ऊर्फ लाला विजय भमोरे (वय २८, रा. चावलमंडी, अचलपूर) याच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी अपहरण, खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याला अचलपूर न्यायालयासमोर हजर केले होते.

स्थानिक आठवडी बाजारातून १५ डिसेंबर रोजी अपहरण केलेल्या रफीकला ठार करून अवशेषाची विल्हेवाट लावल्याची कबुली संशयित आरोपी सचिनने तपास अधिकाऱ्यांपुढे दिली. या कटात अन्य काही साथीदार सहभागी होते.

शेख रफीकचे अपहरण केले. त्यानंतर अचलपूरमधील सन्यासपेंडवर जाळल्यानंतर त्याची विल्हेवाट मध्य प्रदेशातील धाबा गावाजवळच्या मेघा नदीच्या पात्रासह इतर ठिकाणी लावल्याची बाब तपास अधिकाऱ्यापुढे संशयिताने स्पष्ट केली.

पोलिस अधीक्षक हरी बालाजी, अपर पोलिस अधीक्षक श्‍याम घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी पी. जे. अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक गट्टे हे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी नदीपात्राजवळ शेख रफीकच्या शरीराचे काही अवशेष ताब्यात घेतले.

पूर्व वैमनस्यातून शेख रफीकची हत्या
शेख रफीक व सचिन भमोरे यांच्यातील पूर्व वैमनस्यातून शेख रफीकची हत्या केल्याचे दिसून येते. चौकशीतून बऱ्याच बाबी पुढे येतील.
- पी. जे. अब्दागिरे,
उपविभागीय पोलिस अधिकारी

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com