esakal | विमा कंपनीच्या कार्यालयात पोहोचताच कृषिमंत्र्यांना आश्चर्याचा धक्का, गुन्हे दाखल करण्याचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse

VIDEO : विमा कंपनीच्या कार्यालयात पोहोचताच कृषिमंत्री संतापले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विमा कंपन्यांच्या नावाने शेतकऱ्यांची सातत्याने ओरड होत असल्याने राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (agriculture minister dadaji bhuse) यांनी रविवारी (ता.२५) अमरावतीच्या विमा कंपनीच्या (insurance company amravati) कार्यालयाला आकस्मिक भेट दिली व त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सहा बाय सहाच्या एका खोलीत अतिशय भंगार अवस्थेत हे कार्यालय असून त्याठिकाणी विजेचे कनेक्शनसुद्धा नसल्याची बाब कृषिमंत्र्यांच्या लक्षात आल्याने ते चांगलेच संतापले. त्यांनी कृषी सचिवांना फोन करून तातडीने या कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. (agriculture minister dadaji bhuse order to file fir against insurance company in amravati)

हेही वाचा: नाना पटोले फडणवीसांच्या मतदारसंघावर करणार दावा?

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी (ता. २५) जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. भातकुली तालुक्यातील टाकरखेडासंभू, साऊर, वलगाव, दर्यापूर अशा विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी अमरावती हे विभागीय मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या शहरातील विमा कंपनीच्या कार्यालयाचा शोध घेतला. विशेष म्हणजे हे कार्यालय आधी कृषी विभागाच्या कार्यालयातच असल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु, तेथे विमा कंपनीचा कोणताच प्रतिनिधी नव्हता. त्यानंतर ते कार्यालय कुठे आहे, याची माहिती काढण्यात आल्यावर एका सहा बाय सहाच्या खोलीत गोदामासारख्या ठिकाणी हे कार्यालय आढळून आले. ते कार्यालय रद्दी होते. तेथे विजेची व्यवस्थासुद्धा नव्हती. त्यामुळे कृषिमंत्र्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी तेथूनच कृषी सचिवांना फोन लावला व येथील आंखोदेखी कथन केली. संबंधित कंपनीवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले. यासोबतच कृषी विभागाचे जे अधिकारी अशा लोकांना पाठीशी घालत असतील त्यांच्यावरसुद्धा तातडीने कारवाई करण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते.

विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यातील ३ हजार २२१ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, एकाही तक्रारीची दखल विमा कंपनीने घेतली नसल्याची धक्कादायक माहितीसुद्धा कृषिमंत्र्यांना मिळाली. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार विमा कंपन्यांचे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असायला हवे. मात्र, आज अमरावतीत त्या कार्यालयाची अवस्था दयनीय होती. कृषी विभागाचे कुणी अधिकारी अशा कंपन्यांना पाठीशी घालत असतील तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सचिवांना देण्यात आल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अमरावतीच्या काही विभागांत अतिवृष्टी तर काही भागांत सतत पाऊस येत आहे. सोयाबीन, तूर व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाच्या वतीने तातडीने पंचनामे करण्यात येतील व सर्व मसुदा तयार झाल्यावर शासकीय नियमाप्राणे शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top