esakal | इगोचा संसर्ग झाल्याने जनता कर्फ्यूला स्टे, शेगाव येथे कोरोना प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयावरून राजकारण
sakal

बोलून बातमी शोधा

 akola buldana news Politics over decision to stop corona outbreak at Janata Curfew Stay, Shegaon due to Ego infection

नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या विषयात राजकारण आडवे आले. काही जणांचे केवळ इगो दुखावल्या गेले व या "इगो' नावाच्या व्हायरसचा संसर्ग झाल्यानेच शेवटी आज जनता कर्फ्यूला स्टे अर्थात स्थगिती देण्यात आली.

इगोचा संसर्ग झाल्याने जनता कर्फ्यूला स्टे, शेगाव येथे कोरोना प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयावरून राजकारण

sakal_logo
By
संजय सोनोने

शेगाव (जि.बुलडाणा)  :  शेगाव शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग धोका वाढतच असून, दररोज नवनवीन रुग्ण आढळून येत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगरपालिकेने तीन दिवस जनता कर्फ्यु पाळावा असे, आवाहन काल करण्यात आले होते.

मात्र नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या विषयात राजकारण आडवे आले. काही जणांचे केवळ इगो दुखावल्या गेले व या "इगो' नावाच्या व्हायरसचा संसर्ग झाल्यानेच शेवटी आज जनता कर्फ्यूला स्टे अर्थात स्थगिती देण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

बुलडाणा जिल्ह्यातील इतर शहरांप्रमाणे शेगाव कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील व परिसरातील कोरोना रुग्ण संख्या खप मोठी झाली आहे. गत काही दिवसांपासून शहरात दररोज कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे. वेळीच प्रतिबंध न केल्यास परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्‍यक झाले होते.

सीबीएसई बारावी परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थी चमकले 

शेगाव नगरपालिकेने या सर्व बाबी लक्षात घेऊन सोमवार, मंगळवार आणि बुधवार, असे तीन दिवस स्वयंसपूर्तीने जनता कर्फ्यु पाळावा, असे एका आवाहन एका पत्रकाद्वारे करण्यात आले होते. या मागचा उद्देश फक्त आणि फक्त कोरोनाची चैन तोडण्याचा होता; मात्र नेहमीप्रमाणे श्रेयासाठी पुढे-पुढे करणारी मंडळी या प्रकरणातही पुढे आली आणि राजकारण करून गेली.

Video: अरे हे काय? पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क ऑफिसमध्येच सोडले कोब्रा नाग 

विश्‍वासात न घेतल्याचा आरोप
नगरपालिकेने स्थानिक आमदारांना विश्वासात घेतले नाही किंवा त्यांना जनता कर्फ्यु घोषित करण्याचे श्रेय दिले नाही असा आकांडतांडव करीत मुख्याधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला. आमदारांनी त्या लोकांचे ऐकून मुख्याधिकारी यांना धारेवर धरले आणि जनता कर्फ्यू स्थगित करण्याची सूचना दिली. मग काय स्वतःहून पुढे-पुढे करणारी मंडळी जाम खुश झाली आणि तसे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा सपाटा त्यांनी लावला. हे करीत असताना जणू एखादी शिकार जिंकली की काय असा आव ही मंडळी आणतांना दिसून आली.

शेगावसाठी वेगळा न्याय का?
शेगाव नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आणि या पालिकेमध्ये हे कुठलाही निर्णय घेताना मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेतच नाही ही हे सर्वश्रुत आहे. यामुळे या निर्णयात सत्ताधारी पक्षही सामील होता; मात्र या पक्षातील काही पदाधिकारी आणि नवख्यांना सामिल करून घेतले नाही म्हणून एका गटाने हा उपद्रव घडवून आणल्याची चर्चा आहे. आमदार संजय कुटे यांनी कोरोनाची चैन तोडण्यासाठी त्यांच्या होमटाऊन असलेल्या जळगाव जामोद शहरात जनता कर्फ्यू यशस्वी करून दाखविला. हे करीत असताना जनता कर्फ्यू आवश्‍यक असल्याचे तेथे त्यांनी सांगितले होते. मात्र शेगावच्या बाबतीत जनता कर्फ्यू आवश्‍यक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या या भूमिकेमुळे जळगाव जामोद शहराला एक न्याय आणि शेगाव शहराला दुसरा न्याय असे का, असा सवाल नागरिक करीत आहे.

शेगावमध्ये आज सात कोरोनाबधित
शहरातील रोकडीयानगरमध्ये राहणारा 27 वर्षिय युवक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर चारमोरी परिसरातील 40 वर्षाचा पुरुष, एसबीआय मधील 26 वर्षाची महिला, व्यंकटेशनगरला लागून असलेल्या उमेश नगरमधील 24 वर्षीय युवती तर लोहारा येथील 28 वर्षाचा युवक व खामगाव येथील 60 वर्षाचा पुरुष व 50 वर्षांची महिला असे एकूण सातजण शेगावात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image