अरे देवा ! कोरोनामुळे या जिल्ह्यात एकाच दिवशी तीन मृत्यू; २० पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढ होत असली तरी यासोबतच मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मंगळवारी (ता.26) दिवसभरत तीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर सोबतच दिवसभरात पुन्हा 20 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.

अकोला : अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढ होत असली तरी यासोबतच मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मंगळवारी (ता.26) दिवसभरत तीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर सोबतच दिवसभरात पुन्हा 20 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.

क्लिक करा- ‘नवतपा’च्या पहिल्याच दिवशी, सूर्याने ओकली आग; अकोल्यात 47.4 विक्रमी तापमान

सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा अहवाल
मंगळवारी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 315 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 295 अहवाल निगेटिव्ह तर 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दुपारनंतर 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या दोघांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित 36 जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 435 झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात 118 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 4350 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 4098, फेरतपासणीचे 110 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 142 नमुने होते. आजपर्यंत एकूण 4299 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 4047 तर फेरतपासणीचे 110 व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 142 अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 3864 आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल 435 आहेत. तर आजअखेर 51 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा- पूर्व वैमनस्यातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, प्राणघातक हल्ल्यात मुलगा आणि वडील दोघेही...

मंगळवारी 20 पॉझिटिव्ह
मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या 13 रुग्णांपैकी दहा पुरुष व तीन महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण मलकापूर, तीन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित प्रत्येकी नवाबपुरा, अकोटफैल, बाळापूर रोड, शिवाजी पार्क, राऊतवाडी, सतरंजपूरा बाळापूर, पिंजर ता. बार्शीटाकळी, येथील रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी दाखल सात जणांपैकी सर्व पुरुष आहेत. त्यातील पाच जण हे हरिहरपेठ अकोला येथील रहिवासी आहेत तर उर्वरित दोघे जण आंबेडकरनगर अकोटफैल व सबेरी मशीद अकोटफैल येथील रहिवासी आहेत. यात मंगळवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या एका मयत रुग्णाचा समावेश आहे.

तीन मृत्यूची नोंद
दरम्यान सोमवारी (ता.25) रात्री एका 56 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. तो 22 में रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल कालच पॉझिटिव्ह आला. त्याचा उपचार सुरु असतांना काल मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी प्राप्त अहवालात दोन पुरुष रुग्ण मयत झाले आहेत. त्यातील एक सबेरी मशीद अकोटफैल येथील रहिवासी आहे. हा 71 वर्षीय रुग्ण 23 मे रोजी दाखल झाला होता. त्याचा मृत्यू 24 मे रोजी झाला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य रुग्ण हा 66 वर्षीय आगरवेस जुनेशहर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण 18 मे रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल 22 मे रोजी आला होता. तर आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास उपचार घेतांना त्याचे निधन झाले.

कोरोना अपडेट
एकूण पाॅझिटिव्ह-435
मृत्यू -27
आत्महत्या-1
पूर्णपणे बरे झालेले-289
उपचार घेत असलेले-118


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Infected 20 corona found during the day