अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

जळगाव जामोद तालुक्यात पहिल्याच पावसात जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेले बंधारे तुडुंब भरले आहेत. सातपुड़ा पर्वतातून उगम पावणाऱ्या नदी, नाल्यांतून पाणी सुद्धा वाहले.

अकोला - मृग नक्षत्र सुरु होत असताना वऱ्हाडात पावसाने ठिकठिकाणी दमदार हजेरी लावली. बुलडाणा, अकोला व वाशिम या तिन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा पाऊस झाला. 

राज्यात मॉन्सूनचे आगमन अवघे काही दिवसांवर आले असताना, वरहाडात पावसाने हजेरी लावली आहे. 7 जून हा दिवस शेतकऱ्यांसाठी पेरणीला महत्त्वपूर्ण मानला जातो. यावर्षी नेमका हा मुहूर्त साधल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. या भागात मंगळवार दुपारीच पावसाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर आज (बुधवार) पहाटेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. 

जळगाव जामोद तालुक्यात पहिल्याच पावसात जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेले बंधारे तुडुंब भरले आहेत. सातपुड़ा पर्वतातून उगम पावणाऱ्या नदी, नाल्यांतून पाणी सुद्धा वाहले. आजही पावसाचे वातावरण तयार झालेले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​
बसोलीच्या कलावंतांनी साकारले अनोखे भित्तिचित्र​
कोहली फाउंडेशनच्या कार्यक्रमात मल्ल्या ‘बिन बुलाए मेहमान’​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola news vidarbha news rain in akola, buldhana and washim