अकोला : अकोला क्रिकेट क्लब व व्हिसीएचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडे याची आयपीएल 2020 स्पर्धेकरिता सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. तो किंग्स एलेव्हन पंजाबकडून खेळणार आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी दर्शनने बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या टी- 20 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत भारतातून सर्वाधिक 16 बळी घेतले. यापूर्वी दर्शनने 14, 16, 19, 23 स्पर्धेत विदर्भ व मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच 19 वर्षीय भारतीय संघाकडून इंग्लंड येथे कसोटी तर आशिया कपकरिता मलेशिया येथे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दोन वर्षांपासून रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यावर्षी आयपीएल स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळण्याची संधी त्याला मिळणार आहे.
दर्शनच्या निवडीबद्दल त्याचे एसीसीचे अध्यक्ष नानुभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, ऑडीटर दिलीप खत्री, सदस्य ॲड. मुन्ना खान, गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, कर्णधार भरत डिक्कर, माजी कर्णधार विवेक बिजवे, सदस्य ॲड.मुन्ना खान, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, रणजी खेळाडू रवी ठाकूर, सुमेध डोंगरे, पवन हलवणे, अमीत माणिकराव, शारिक खान, देवकुमार मुधोळकर, किशोर धाबेकर यांच्यासह क्लबच्या खेळाडूंनी त्यचे अभिनंदन केले.