पुणे मार्गांवर एसटीची स्लिपर बस सेवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

अकोला : सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात एसटी महामंडळाने अकोला-पूणे मार्गांवर स्लिपर बस सेवेला येथील मध्यवर्ती आगारातून प्रारंभ केला आहे. एसटीपासून दुरावलेल्या आणि खाजगी वाहतूकीकडे गेलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीने स्वताःकडे वळविण्यासाठी हे पाऊलं उचलल्याची माहिती आहे. सर्वसामान्य प्रवाशी, पासधारक, सवलतधारक यांच्यासाठी ही सेवा फायद्याची ठरणार आहे. या बसमध्ये आसन आणि वरील भागात शयनयान अशी दुहेरी सुविधा आहे. विनावातानुकुलीत असल्याने या बसचे दर एसटीच्या हिरकणी बसच्या दरात राहणार आहेत.

अकोला आगार क्र.2 च्या मध्यवर्ती बसस्थानक येथून दररोज सायंकाळी 5 वाजता पुणे ही बस पुण्याकरीत सुटेल. या बसच्या प्रवासी वाहतुकीला नुकताच प्रारंभ झाला. या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून एकेरीफेरीचे 30 ते 35 हजार रुपयाचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. रातराणी बस म्हणून या बसचा वापर होणार आहे. बसमध्ये 30 आसनी तर 15 शयनयानची सुविधा आहे.

महत्त्वाचे - शाळांचा प्रायोगिक तत्वावर विकास करणार 

असा आहे मार्ग
येथील मध्यवर्ती आगारातून 5 वाजता ही बस सुटल्यावर अकोला, खामगाव, चिखली, जालना, औरंगाबाद, अहमदनगर मार्गे पुण्यात पोहोचेल. त्यानंतर नियोजित वेळेनूसार परतीच्या प्रवासाला प्रारंभ होईल, असे रा.प.कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - मोबाईल कंपन्यांना शेवटची संधी

हे आहेत तिकीट दर
अकोला-पूणे करीता 835, जालना- 325, खामगाव- 50 रुपये असा दर आकारण्यात आले आहेत. अकोला विभागातून पुणे, नाशिक, औरंगाबाद या लांबपल्ल्यांच्या शहरासाठी रातराणी बस म्हणून आणखी काही विना वातानुकुलीत शयनयान बस उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. सर्वसामान्य प्रवासांना परवडेल या दरात सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola pune sleepar bus