एसटीचे 26 हजार प्रवाशी सवलतीच्या प्रवासाला मुकणार ?

st smart card
st smart card

अकोला : नवीन वर्ष म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून एसटीत सवलतीच्या दरात प्रवास करायचा असेल तर स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. मात्र अकोला रा.प.विभागात नोंदणी झालेल्या 51 हजार 159 स्मार्ट कार्ड पैंकी केवळ 24 हजार 822 कार्डच वितरत झाल्याचे पुढे आले आहे. परिणामी स्मार्ट होऊ पाहणाऱ्या एसटीच्या कारभाराला गतीमानता नसल्याचे दिसत आहे.

 19 दिवसात 26 हजार 277 कार्ड नागरिकांना वितरीत न झाल्यास हे प्रवाशी नवीन वर्षांत सवलतीच्या दरातील प्रवासाला मुकणार का? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. एसटीच्या 71 व्या वर्धापनदिनी राज्याचे तत्कालीन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्मार्टकार्ड योजनेचा शुभारंभ केला. त्यामुळे एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. तसेच सवलतीच्या दरात प्रवास करणारे वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांकरिता महामंडळाने स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे. तसेच दिव्यांग, कर्नबधिर यासह विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहा महिन्यांपुर्वी स्मार्ट कार्ड काढण्याची सक्ती रा.प.कडून करण्यात आली होती. त्यानूसार विविध आगारात स्मार्ट कार्डची नोंदणी लाभार्थ्यांकडून करण्यात आली. ही नोंदणी करताना ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकरच्या अडचणींना समोर जावे लागले. शिवाय अपुऱ्या मणुष्यबळावर हे कामकाज लादल्याने कर्मचाऱ्यांचीही मोठी डोकेदुखी झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यानंतर आता एसटीने 1 जानेवारीपासून एसटीत प्रवास करायचा असेल तर स्मार्ट कार्ड ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी केवळ 19 दिवसांचा कालावधी क्षिल्लक आहे. मात्र अजूनही अकोला विभागातील 51 हजार 159 नोंदणी केलेल्या प्रवाशांपैंकी 26 हजार 277 प्रवाशांचे स्मार्ट कार्ड पोहोचलेच नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या नागरिकांना प्रवासाला मुकावे तर लागणार नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तर स्वप्त भंगणार!
नवीन वर्षांत अनेक नागरिकांकडून बाहेर ठिकाणी प्रवास करण्याचे नियोजन केले जाते. मात्र त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह ‘स्मार्ट कार्ड’ योजनेतील पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचाही समावेश असते. मात्र त्यांचे कार्ड अद्यापही त्यांच्यापर्यंत न पोहोचल्याने नवीन वर्षांत एसटीने प्रवास करण्याचे त्यांचे स्वप्न भंगणार तर नाही ना याची काळजी रा.प.महामंडळाला घ्यावी लागणार आहे.

असा आहे ‘स्मार्ट कार्ड’चा आलेख
नोंदणी वाटप
ज्येष्ठ नागिरक  43,706  पैकी  22,261
विद्यार्थी   7,365   पैकी   2,438
एकूण   51,159   पैकी  24,822

वितरीत करणे बाकी 26, 277

काय म्हणतात एसटीचे अधिकारी
19 दिवसांत 26 हजार 277 कार्ड प्रवाशांना मिळणार कशी यासंदर्भात एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, ते म्हणाले काही आगारांमध्ये कार्ड आलेले आहे. मात्र प्रवाशांकडूनच त्यांचे कार्ड नेण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com