esakal | अरे व्वा! लॉकडाउन मध्ये महिलांना मिळाला उत्तम रोजगार 
sakal

बोलून बातमी शोधा

tanishka.jpg

अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांनी अकोला जिल्यातील विविध बचतगट व सामाजिक कार्यात गृह उद्योग करणाऱ्या महिलांना रोजगार मिळावा व कुटुंबाला हातभार लागावा या अनुषंगाने त्यांनी खास ‘सकाळ’ तनिष्का गटाला टप्याटप्याने 40 हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे घर बसल्या महिलांना आता स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे.

अरे व्वा! लॉकडाउन मध्ये महिलांना मिळाला उत्तम रोजगार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि. अकोला) : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. त्यातच देशासह अकोला जिल्ह्यातील कोरोनाची वाढती लोकसंख्या पाहता लॉकडाउन-चार सुरू झाले आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय हे पूर्णतः ठप्प झाले आहेत. त्यातच अकोट तालुका माहेर व तेल्हारा तालुका सासर असलेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांनी अकोला जिल्यातील विविध बचतगट व सामाजिक कार्यात गृह उद्योग करणाऱ्या महिलांना रोजगार मिळावा व कुटुंबाला हातभार लागावा या अनुषंगाने त्यांनी खास ‘सकाळ’ तनिष्का गटाला टप्याटप्याने 40 हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे घर बसल्या महिलांना आता स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा- पॉझिटिव्ह अहवालाची त्रीशतकाकडे वाटचाल, दहा पुरुषांसह सात महिला पॉझिटिव्ह

16 महिलांचा आहे सहभाग
‘सकाळ’ तनिष्का तेल्हारा महिला टीमच्या दीपिका देशमुख यांनी ती ऑर्डर स्वीकारत महिलांना स्वलांबी केले आहे. त्यामुळे त्याच्या हाताला काम मिळाल्याने त्यासुध्दा मोठ्या आनंदाने ते मास्क बनविण्याचे काम गतीने करीत असून, दर दिवसाला मोठ्या प्रमाणात मास्क निर्मिती होत आहे. तेल्हारा तनिष्का गटात सध्या 16 महिला कार्यरत आहे. त्या दरदिवसाला चार ते पाच हजार मास्क तयार करीत आहेत. तर दुसरीकडे या ऑर्डर एवढ्यापुरतीच मर्यादित नसून जोपर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होत नाही तो पर्यंत हे मास्क तयार करण्यात येतील. त्यामुळे साधारणत: पुढील सहा महिने तरी आपल्याला ही ऑर्डर मिळत राहणार आहे.

क्लिक करा- राष्ट्रवादीने त्या नेत्याला आमदार करून भाजपसह वंचित बहुजन आघाडीला दिली टक्कर

सोनाळ्यातील गटानेही केली सुरुवात
प्रत्येक तनिष्काला रोजचे दीडशे ते दोनशे रुपये एवढा कामाचा मोबदला मिळणार आहे. स्वतःच्या घरात बसून, स्वतःच्या मशीनवर त्यांना हे काम दिल्या जात आहे. आतापर्यंत 200 मीटर कापडाचे मास्क शिवायला सुरूवात झाली आहे. तसेच याआधी पण अकोट तनिष्का गट व तेल्हारा तनिष्का गटालाही प्रत्येकी तीन हजार मास्क तयार करण्याचे ऑर्डर मिळाले होते. ते पूर्ण करून दिल्यामुळे ही 40 हजार मास्क तयार करून देण्याची ऑर्डर शासनाच्या जिल्हा परिषदेकडून अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांच्या पुढाकाराने तनिष्कांना मिळाली आहे. त्यामुळे तनिष्का महिला गट आनंदाने आपले कार्य पार पाडत आहेत. सोमवार (ता.18) पर्यंत पाचशे मीटर कापडांचे मास्क शिवण्यात आले. सोबतच सोनाळा तनिष्का गट यांनी पण मास्क शिवायला सुरुवात केली आहे.

ह्या घेत आहेत परिश्रम
तेल्हारा तनिष्का गट प्रमुख दीपिका देशमुख, सदस्य माया ढोकने, शारदा ढोले, पदमा पाटील, वैशाली देशमुख, रेखा अवचार, प्रमोदींनी मेतकर, प्रतिभा कांगटे, पल्लवी कांगटे, दर्शना घोडेस्वार, वंदना घोडेस्वार, इंदूताई ढोकने, माधवी खारोडे, कल्पना कोरपे, पुजा कोरपे, नंदिनी भिसे यांच्यासह अन्य महिला या मास्क तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. 

loading image