अरे देवा! लॉकडाउनमध्येही पाण्यासाठी भटकंती; या तालुक्यात आहे पाणी टंचाई

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

बार्शीटाकळी ग्रामपंचायत काळापासून अकोला महानगरपालिकेचा पाणीपुरवठा कर कोट्यावधी रुपये बाकी असल्याने गेल्या दहा वर्षापासून बार्शीटाकळी शहरात नळयोजना बंद आहे. अशा स्थितीमध्ये नागरिक मुख्य जलवाहिनीच्या लिकेज मधून हात पंप व शेत शिवारातील विहिरी वरुन पाणी भरत आहेत.

बार्शीटाकळी (जि. अकोला) : कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याने शहरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न पुढे आले. नागरिकांची पाण्यासाठी भटकंत होत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहरात पिण्याचे पाण्याचे कुठलेही पुरेशा प्रमाणात स्रोत नसल्याने नागरिकांनी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी तर कुठून आसा प्रश्न सामान्य नागरिकांना आहे.

हेही वाचा- पॉझिटिव्ह अहवालाची त्रीशतकाकडे वाटचाल, दहा पुरुषांसह सात महिला पॉझिटिव्ह

अकोला मनपाकडे कोट्यावधी कर बाकी
अकोला महानगर पालिकेच्या माध्यमातून काटेपूर्णा धरणातून शहरवासीयांना पाणीपुरवठा होत असायचा. मात्र, बार्शीटाकळी ग्रामपंचायत काळापासून अकोला महानगरपालिकेचा पाणीपुरवठा कर कोट्यावधी रुपये बाकी असल्याने गेल्या दहा वर्षापासून बार्शीटाकळी शहरात नळयोजना बंद आहे. अशा स्थितीमध्ये नागरिक मुख्य जलवाहिनीच्या लिकेज मधून हात पंप व शेत शिवारातील विहिरी वरुन पाणी भरत आहेत. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे व वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी कमी झाल्याने बार्शीटाकळी शहरवासीयांना पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. भर उन्हात शेतातील विहिरीमधून व हातपंपावरून नागरिकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. शाहराकरिता शासानाकडून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून, सध्या त्याचे कार्य प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. संचारबंदी असल्यामुळे त्यालाही मर्यादा आल्याने नागरिकांचा पाणी प्रश्‍न उग्र झाला आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

क्लिक करा- राष्ट्रवादीने त्या नेत्याला आमदार करून भाजपसह वंचित बहुजन आघाडीला दिली टक्कर

तत्काळ उपाययोजना करावी
बार्शीटाकळी शहरात भीषण पाणीटंचाई असून, याबाबत प्रशासन गंभीर नाही. नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी शेत शिवारत व इतर ठिकाणी जावे लागत आहे. माझ्या प्रभागात हातपंप व बोरवेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करीत आहे. प्रशासानाने याबाबत तत्काळ उपाययोजना करावी.
-लईका खान सरफाराज़ खान, नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Water scarcity intensifies in Barshitakali