दिग्गजांची लागणार कसोटी

ZP
ZP

अकोला : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील दिग्गज नेत्यांची कसोटी लागणार आहे. प्रचारातील शेवटच्या दोन दिवसात मतदारांना रिझविण्यात कितपत यशस्वी होतात यावरही निवडणुकीची रंगणत ठरणार आहे. सर्वच पक्षातील विद्यमान सदस्य विरुद्ध प्रथमच निवडणुकीची रिंगणात उतरत असलेल्या उमेदवारांमध्ये झुंज बघावयास मिळत आहे.

मिनिमंत्रालयाची निवडणूक म्हणजे स्थानिक नेत्यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी असते. पंचायत समिती गणातील साथीदारांसोबत समन्वय राखत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नेत्यांचे पुढीचील राजकीय भविष्यच या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागले आहे. त्यात सर्वच पक्षांनी काही विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर काहींना प्रथमच गटाच्या नेतृत्वाची संधी मिळणार आहे. यात बहुतांश पक्ष संघटनेतील विविध पदावर कार्यरत पदाधिकारी आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या लढतीही लक्षवेधी ठरणार आहेत. ते राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. त्यात गजानन पुंडकरांसह काही प्रमुख अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. हे उमेदवार स्वपक्षाच्या उमेदवारांविरुद्धच बंडखोरी करून रिंगणात उतरले आहेत.


भाजपच्या या दिग्गजांकडे लक्ष
भाजपचे विद्यमान सदस्य रमण जैन यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहे. दोन माजी जिल्हा परिषद सदस्य नयना मनतकार व डॉ. शंकर वाकोडे यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. मनोहर हरणे, गजानन उंबरकर, सौ. मायाताई कावरे व सौ. निकिता रेड्डी यांच्यासह शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पद्मावती अमरसिंग भोसले यांची कसोटी लागणार आहे. याशिवाय प्रथमच रिंगणात उतरत असलेले मधुकर नागोराव पाटकर, स्वाती विनीत भारसाकळे, गणेश श्रावण पोट, पवन महादेव बुटे, गीता अशोक राठोड आदच्या लढतीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्वच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेवा विरुद्ध भाजप अशी लढत बघावयास मिळणार आहे.


शिवसेनेचे हे दिग्गज रिंगणात
शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरुमकार, गायत्री संगित कांबे, गोपाल भटकर, विजय दुतोंडे, विकास पागृत, अप्पू तिडके, जोत्सनाताई चोरे आदी दिग्गजांच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


‘वंचित’च्या या दिग्गजांच्या लढत लक्षवेधक
विद्यमान सदस्य गोपाल कोल्हे यांच्या पत्नी, शोभा शेळके, प्रतिभा अवचार, शंकरराव इंगेळ, ज्ञानेश्‍वर सुलताने, चंद्रशेख पांडे गुरुजी, वैशाली मोहड, पुष्पाताई इंगळे, राम गव्हाणकर, राजेंद्र पातोडे, अशोक सिरसाट, सतिष मखराम पवार आदी वंचित बहुजन आघाडीच्या दिग्गजांच्या लढती लक्षवेधक ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यातील अनेकांकडे पक्षातील महत्त्वाच्या पदांची जबाबदारीही आहे.


काँग्रेस, राष्ट्रवादीच्या या नेत्यांच्या लढतींकडे लक्ष
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दादा मते पाटील यांचा मुलगा नीलेश मते, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, डॉ.संजीवणी बिहाडे, ज्योती उदय देशमुख, बाळकृष्ण बोंद्रे, हेमंत देशमुख, वंचित बहुजन आघाडीतून काँग्रेसमध्ये आलेले दिनकर वाघ, लखूआप्पा लंगोटे, पंढरी हाडोळे या काँग्रेस उमेदवारांसह राष्ट्रवादीचे शिवाजी म्हैसने, पुंडलिक अरबट आदींसह प्रमुख पदाधिकारी रिंगणात असून, त्यांच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com