sand price hike
sand price hikesakal

Ambada : वाळू दरवाढीमुळे घरकुलांचे बांधकाम डोईजड, अनुदानात वाढ करण्याची मागणी

सरकारच्या मोफत वाळू योजनेचा फज्जा उडाला आहे. दुसरीकडे वाळूच्या दरात मोठी वाढ झाल्याने ती घेणे लाभार्थ्यांना अडचणीचे ठरू पाहत आहे. त्यामुळे घरकुल बांधकामाचे स्वप्न तरी दिव्यस्वप्नच ठरू पाहत आहे.

Ambada : सरकारच्या मोफत वाळू योजनेचा फज्जा उडाला आहे. दुसरीकडे वाळूच्या दरात मोठी वाढ झाल्याने ती घेणे लाभार्थ्यांना अडचणीचे ठरू पाहत आहे. त्यामुळे घरकुल बांधकामाचे स्वप्न तरी दिव्यस्वप्नच ठरू पाहत आहे. शासनाने महागाईदरानुसार अनुदानात वाढ करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

प्रत्येक व्यक्तीला स्वतः चे घर असावे, असे स्वप्न बघतो. हे स्वप्न केंद्र व राज्य सरकारच्या घरकुलांच्या विविध योजनांमधून पूर्ण होत आहे. परंतु वाढत्या महागाईत घराचे बांधकाम करणे घरकुल लाभार्थ्यांना जिकरीचे ठरत आहे. घरकुलासाठी लागणारे साहित्य विटा, सिमेंट, वाळू, लोखंड, चुरी व मजुरीच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

या योजनांच्या अनुदानात करावी वाढ

गोरगरिबांना स्वप्नातील घरांचे बांधकाम पूर्ण करता यावे, याकरिता पंतप्रधान आवास योजना, शबरी, रमाई तसेच विविध योजना आहेत. या योजनांचे अनुदान फक्त दीड लाख रुपये आहे.

दीड लाखांमध्ये घरकुलाचे बांधकाम होणे शक्य आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. बॅंक कर्ज देत नाही. गावातील सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत असल्याने कर्जाचा डोंगरही वाढत आहे. त्यामुळे अनुदानामध्ये मोठी वाढ करावी,अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

महागाई,वाळूची दरवाढ घातक

अनेक योजनेच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम पूर्ण करून कुटुंबांना निवासाची सुविधा निर्माण केल्या जात आहेत. परंतु, वाढत्या महागाईत इमारत बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने घरकुल पूर्ण करणे अडचणींचे ठरत आहे.

काही ठिकाणी पंतप्रधान आवास योजना तर काही शबरी योजनेतंर्गत घरकुलांचे बांधकाम चालू आहे. गावात घरकुलांचे बांधकाम सुरू झालीत. वाढलेल्या साहित्याची झळ तर बसत असतानाच आता अभावी बांधकामे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

sand price hike
Home Booking : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात तब्बल १२ हजार घरांचे बुकिंग

अधिकाऱ्यांचा बघ्याची भूमिका

महसूल विभागाचे अधिकारी संबंधितांवर कारवाई करीत असल्याने घरकुल बांधण्यासाठी वाळू आणायची कुठून असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर आहे. वाळूअभावी घरकुलाचे बांधकाम प्रभावित झाली आहेत. बांधकामे वेळेत पूर्ण होण्याची आशा मावळली आहे.

शासनाच्या नियमानुसार वर्षभरात घरकुल पूर्ण झाले पाहिजे, असा नियम आहे. परंतु वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुल कसे वेळेत पूर्ण करणार. असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

sand price hike
House Rate : घरांच्या किमती येणार आवाक्यात; शहर परिसरात आता सहा हजार हेक्टर निवासी क्षेत्र

शासनाने पाच ब्रास वाळू तातडीने घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. तसेच गावखेड्यातील नाल्यावरून छोट्या नदीतून सहज उपलब्ध होणाऱ्या वाळूला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी अडवणूक न करता घरकुल लाभार्थ्यांना रीतसर परवानगी द्यावी.

-मयूर उमरकर,सदस्य, पं. स. नरखेड

घराचे काम लावले शासन एकाच वेळेस पूर्ण पैसे देत नाही त्यामुळे काम करायला त्रास होत आहे व शासनाकडून रेती मिळत नसल्याने घराचे काम करण्यासाठी कर्जाची उचल करून काम संथ गतीने करावे लागत आहे

-नागोराव नेहारे, घरकुल लाभार्थी अंबाडा

जवळपास एक महिना झाला. घराचे काम सुरू केले. शासन ५ ब्रास वाळू देणार होते, मात्र दिली नाही. त्यामुळे आता पैसे देऊनही वाळू मिळत नसल्याने घराचे काम थांबले आहे.

-दिनेश भड, घरकुल लाभार्थी, अंबाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com