esakal | अमरावती : २३ लाखांचे मोबाईल लंपास; दोन प्रतिष्ठाने फोडली
sakal

बोलून बातमी शोधा

mobile theft

अमरावती : २३ लाखांचे मोबाईल लंपास; दोन प्रतिष्ठाने फोडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहर कोतवाली ठाण्यापासून शंभर मिटर अंतरावर जयस्तंभ चौकातील दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी २३ लाखांचे मोबाईल लंपास केले. दोन्ही व्यापारी प्रतिष्ठानामध्ये चोरी करण्यासाठी चोरट्यांनी समोरचे शटर तोडले.

जयस्तंभचौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ रस्त्यालगत बकुल कक्कड यांचे सॅमसन स्मार्ट कॅफे नावाचे मोबाईल विक्रीचे प्रतिष्ठान आहे. मध्यरात्रीला त्यांचे दुकान चोरट्यांनी फोडले. येथून जवळपास १७ लाखांचे महागडे मोबाईल हॅण्डसेट चोरीस गेले. त्यानंतर चोरट्यांनी येथून दहा मिटरवर रायली प्लॉटकडे जाणाऱ्या मार्गावर एका चाटभंडार समोरची योगेश रतलानी यांचे आर. के. टेलीकॉम हे प्रतिष्ठानही फोडले.

हेही वाचा: अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

येथून सुद्धा विविध कंपनीचे ७ ते ८ लाखांचे मोबाईल हॅण्डसेट चोरीस गेले. दोन्ही ठिकाणी चोरी करण्याची पद्धत सारखीच आहे. त्यामुळे दोन्ही घटनांमागे एकाच टोळीचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. घटनेनंतर शहर कोतवालीसह, गुन्हेशाखेच्या पोलिसांना येथे पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक, ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. दोन्ही मालकांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे

घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही व्यापारी प्रतिष्ठानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात एकाचवेळी पाच ते सहा जणांनी दुकानात प्रवेश केल्याचे दिसून येते. हे फुटेज पोलिसांनी जप्त केले.

दहा वर्षांपूर्वीही झाली होती चोरी

श्री. कक्कड यांच्या सॅमसन स्मार्ट कॅफे हे प्रतिष्ठान १२ जुलै २०११ रोजी सुद्धा फोडून येथून लाखोंचे महागडे हॅण्डसेट चोरीस गेले होते. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. हा गुन्हा काही दिवसातच उघडकीस आला होता.

गस्त संशयाच्या भोवऱ्यात

मार्केट परिसर असल्याने हा रस्ता रहदारीचा आहे. संबंधित पोलिस ठाण्यासह शहरातील नाईटगस्त सुद्धा सुरूच असते. ज्यावेळी दोन्ही प्रतिष्ठाने चोरट्यांनी फोडली. त्या दरम्यान पोलिसांचे एकही वाहन या मार्गाने गेले नसेल काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

loading image
go to top