चेनस्नॅचिंग रोखण्यासाठी अमरावतीचे सीपी रस्त्यावर; आकस्मिक भेटीमुळे अधिकाऱ्यांची तारांबळ

संतोष ताकपिरे 
Thursday, 14 January 2021

पोलिस आयुक्तांसोबत शहर कोतवालीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बचाटे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, राहुल आठवले उपस्थित होते.

अमरावती ः काही दिवसांपासून चेनस्नॅचिंगच्या वाढत्या घटना पुन्हा संक्रांतीच्या दिवसात वाढू नये, यादृष्टीने पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी बाजारपेठेचा आढावा घेतला. रस्त्यावर उतरून वाहतुकीसंदर्भात काही बदल करण्याच्या सूचना या वेळी त्यांनी केल्या.

पोलिस आयुक्तांसोबत शहर कोतवालीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बचाटे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, राहुल आठवले उपस्थित होते.

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

सद्य:स्थितीत संक्रांतीचे दिवसात महिला मोठ्या संख्येने बाजारपेठेत वाणासह इतर वस्तू खरेदीसाठी येतात. अशा वेळी दागिने घालून येणाऱ्या महिलांकडे चोरट्यांची नजर जाऊ शकते. घटना टाळण्यासाठी महिलांनी गर्दीमध्ये फिरताना सावध राहण्याची गरज असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. मार्गात बॅरिकेटिंग करून बाजारपेठेत फिरणाऱ्या संशयितांची पोलिसांनी चौकशी करावी, सोबतच पोलिसांनी नाकाबंदी ही खानापूर्तीसाठी न करता नागरिकांना त्रास होऊ नये, यादृष्टीने प्रयत्न करावे अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांना या पाहणी दौऱ्यात केल्या. 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

सकाळी 11 ते दुपारी एक या कालावधीत पोलिस आयुक्तांनी आकस्मिकपणे रस्त्यावर उतरून सुरक्षेचा आढावा घेतला. नाकाबंदी ड्यूटी पॉइंटवर तैनात अधिकारी, कर्मचारी किती सतर्क आहेत याचा आढावाच त्यांनी घेतला. त्यांच्या समवेत पोलिस उपायुक्त व सहायक आयुक्तही हजर होते. सीपी अचानक रस्त्यावर उतरून पाहणी करतील याची पूर्वकल्पना नसल्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati CP are on road to take action on chain snatching