Amravati : मालखेड रेल्वे स्टेशन नजीक मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati : मालखेड रेल्वे स्टेशन नजीक मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

Amravati : मालखेड रेल्वे स्टेशन नजीक मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

मालखेड : नागपूर वरून भुसावळकडे जाणाऱ्या रुळावर ही मालगाडी जात होती 23 ऑक्टोबर च्या मध्यरात्री 12 ते 1 च्या दरम्यान मालखेड रेल्वे स्टेशन जवळ या गाडीचे तब्बल 18 डब्बे या दुर्घटनेत बाधित झाली असून कोळसा वाहून नेणारी ही मालगाडी होती.

हेही वाचा: Amravati : नायब तहसीलदाराला लाच घेताना पकडले

यावेळी रेल्वे प्रशासनासोबत जिल्हा प्रशासन,तहसील प्रशासनाचे तहसीलदार राजेंद्र इंगळे नायब तहसिलदार केशव मळसने,मंडळ अधिकारी अमोल देशमुख, तलाठी प्रफुल्ल गेडाम पोलीस पाटील एम व्ही माहुरे घटनास्थळी पोहचले असून रेल्वे प्रशासनाला सदर दुरुस्ती कार्यास सहकार्य करीत आहे.

हेही वाचा: Amravati : जामडोल येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

सदर दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही,रेल्वे प्रशासन अत्यंत ऍक्टिव्ह मोड आलेले असून रेल्वेचे शेकडो कर्मचारी व अधिकारी स्थानिक घटनास्थळी आहेत. हा रेल्वे अपघात बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली.

हेही वाचा: Amravati : आज पार पडणार ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ सन्मान सोहळा

अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या असून सदर दुरुस्ती चे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या अपघातानंतर रेल्वे ची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.