Amravati : आज पार पडणार ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ सन्मान सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Idol Maharashtra award

Amravati : आज पार पडणार ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ सन्मान सोहळा

अमरावती : आपल्या कार्यकर्तृत्वाने शहर व गावांच्या विकासात योगदान देत सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या मान्यवरांचा बुधवारी (ता.१२) ‘सकाळ ऑयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’मध्ये पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Amravati : लहान मुलांच्या ICU ला आग; 2 मुलं किरकोळ जखमी

अमरावतीच्या नागपूर महामार्गावरील हॉटेल गौरी इन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. अमरावतीचे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, ज्येष्ठ उद्योजक अरुण वरणगावकर यांच्या हस्ते ‘सरपंच अवॉर्ड’ व ‘पॉलिटिकल आयकॉन’सह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराचे वितरण होणार आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांमध्ये जनसेवेचे कार्य करून आपली नवी ओळख निर्माण केलेल्या मान्यवरांचा पुरस्काराने गौरव यावेळी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Amravati : मासे पकडण्याचा मोह बेतला जिवावर; तिघांचा बुडून मृत्यू

‘सकाळ माध्यम समूह’ नेहमीच समाजातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. शहर व ग्रामीण भागात विकासासाठी सातत्याने काम करीत पायाभूत सुविधांबाबत जनतेला न्याय मिळवून देणारे नगरसेवक, माजी नगरसेवक, सरपंच तसेच समाजासाठी झटणाऱ्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे कौतुक केल्यास त्यांना नवी ऊर्जा मिळते व त्यांच्या कार्यापासूनच समाजातील इतर घटकांनाही नवीन प्रेरणा मिळते.

हेही वाचा: Amravati: मतदान केंद्रावर दोन गटात राडा; देवेंद्र भुयारांना धक्काबुक्की?

अशांच्या कार्याची दखल ‘सकाळ’ नेहमीच घेत आला आहे. त्यांचे शहर, गाव, समाजासाठी अमूल्य योगदान आणि त्यांच्या यशोगाथा समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत ‘सरपंच अवॉर्ड’ व ‘पॉलिटिकल आयकॉन’ पुरस्काराने मान्यवरांचा गौरव होणार आहे.

स्थळ : हॉटेल गौरी इन, अमरावती.

दिनांक : बुधवार १२ ऑक्टोबर २०२२

वेळ : दुपारी १२.०० वाजता

केवळ निमंत्रितांनाच प्रवेश