आमदार तायडेंच्या भावाला ठार मारण्याचा कट; माजी मंत्री बच्चू कडूंसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Amravati Murder Plot Case Against Bacchu Kadu : बच्चू कडू, शुभम ऊर्फ गोलू माहोरेसह अन्य एक अशी चांदूरबाजार ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
Amravati Murder Plot Case

Amravati Murder Plot Case

esakal

Updated on

अमरावती : अपघाताचा बनाव करून आमदार प्रवीण तायडे यांचे चुलतभाऊ अभिजित दिगंबर तायडे (वय ४०) यांना ठार मारण्याचा कट रचण्याच्या आरोपाखाली माजी मंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्यासह अन्य दोघे अशा तिघांविरुद्ध शुक्रवारी (ता. ३) चांदूरबाजार ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बच्चू कडू, शुभम ऊर्फ गोलू माहोरेसह अन्य एक अशी चांदूरबाजार ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com